नवी दिल्ली 30 एप्रिल : अनेक वेळा मौजमजा करण्यासाठी आपण दूरच्या डोंगरावर किंवा समुद्रात जातो, पण हे सुंदर दिसणारे पर्वत आणि समुद्र पर्यटकांसाठी कधीकधी जीवघेणेही ठरतात. या समुद्र आणि पर्वतांवर अनेक प्राणी आहेत. यापैकी बरेच प्राणी असेदेखील आहेत, जे अत्यंत धोकादायक आहेत. ते काहीच क्षणात तुमचा जीव घेऊ शकतात. असाच काहीसा प्रकार गोव्याच्या बीचवर मौजमजा करताना पर्यटकांसोबत घडला. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मजा करत असताना एक महाकाय किंग कोब्रा त्यांच्यामध्ये आला, जे पाहून सर्वांनाच घाम फुटला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मोठा किंग कोब्रा दिसत आहे. एक व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हायरल व्हिडिओ गोव्यातील समुद्रकिनाऱ्याचा आहे, जिथे काही पर्यटक मजा करत असताना अचानक एक महाकाय साप बाहेर आला. समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला पडलेल्या झुडपात सुमारे 15 ते 16 फूट लांबीचा किंग कोब्रा लपला होता, त्यावर पर्यटकांची नजर गेली. यानंतर, एका सर्प पकडणाऱ्याला पाचारण करण्यात आलं, ज्याने खूप प्रयत्नांनंतर या मोठ्या किंग कोब्राला आटोक्यात आणलं. हा व्हिडिओ पाहणारे सगळेच थक्क झाले. इतका मोठा किंग कोब्रा याआधी क्वचितच कोणी पाहिला असेल. साप पकडणाऱ्याने किंग कोब्राला स्वत:च्या हाताने पिशवीत टाकलं. हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आत्तापर्यंत 70 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, हजारो लोकांनी लाईकही केला आहे. अनेक यूजर्सनी कोब्रा पकडणाऱ्या व्यक्तीचं कौतुकही केलं आहे.