Home /News /viral /

13 वर्षांच्या मुलाचा बिझिनेस फंडा! करतोय लाखोंची कमाई, पैसे कमवण्यासाठी शाळाही सोडली!

13 वर्षांच्या मुलाचा बिझिनेस फंडा! करतोय लाखोंची कमाई, पैसे कमवण्यासाठी शाळाही सोडली!

Teenager Left School to become Chef : ओमारी मॅक्वीन आपल्या स्वयंपाकाच्या कौशल्यातून लाखो रुपये कमावत आहे, परंतु आता प्रश्न उपस्थित होत आहे की, लहान वयात शाळा सोडून पैसे कमवणे म्हणजे त्याला बालकामगार म्हणावं का?

  नवी दिल्ली, 12 मे : वयाच्या 13 व्या वर्षी, बहुतेक मुलांना फक्त अभ्यासाची काळजी असते किंवा ते त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवतात. करिअर वगैरेंचा विचार दहावीनंतर केला जातो. बिझिनेस सेट करणं हे तसं फार सोपं मानलं जात नाही. स्वतःचा बिझिनेस सुरू करण्यासाठी निदान कोणत्या तरी प्रकारचा अनुभव असणं आवश्यक आहे, असंही आपण अनेकांकडून ऐकतो. मात्र, एका 13 वर्षांच्या मुलाने केवळ स्वतःचा बिझिनेस सुरूच केलेला नाही तर, तो त्यातून लाखो कमावतोय. इतकंच नाही तर त्याने या बिझिनेसला वेळ देता यावा म्हणून शाळाही सोडलीय. 13 व्या वर्षी इतकी मोठी झेप घेणाऱ्या या मुलाचं नाव आहे ओमारी मॅक्वीन. तो शाकाहारी शेफ (vegan chef) म्हणून ऑनलाइन हिट झाला आहे. तो आता लाखो रुपये कमावतोय आणि या करिअरच्या नादात त्याने शाळाही सोडली आहे. या मुलाला (Teenager Left School to become Chef) त्यांच्या फॉलोअर्सची कमतरता नाही आणि ते त्यांची स्तुती देखील करतात.
  ओमारी मॅक्वीन (Omari McQueen Social Media Chef) फक्त 8 वर्षांचा होता, जेव्हा त्याने वही-पेन्सिलपेक्षा, चाकू आणि काट्यामध्ये जास्त रस घ्यायला सुरुवात केली. आईच्या आजारपणामुळे ओमरीने स्वयंपाक करायला सुरुवात केली. पण हे काम त्याला इतकं आवडलं की, त्याने पुस्तकांपेक्षा या छंदाला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली आणि आज तो इंटरनेटच्या जगतात एक प्रसिद्ध शाकाहारी शेफ आहे आणि यातून तो चांगली कमाईही करत आहे. युट्युब चॅनलनंतर कंपनीही लाँच केली 13 वर्षीय ओमारी मॅक्वीनने युट्यूब चॅनलवर केवळ त्याच्या स्वयंपाकाशी संबंधित व्हिडिओच टाकलेत असं नाही तर, त्याची स्वतःची कंपनी देखील आहे. ओमारीचे YouTube वर 28,000 फॉलोअर्स आहेत, जे त्याच्या रेसिपी आणि टिप्स फॉलो करतात. त्याचे सर्व खाद्यपदार्थ शाकाहारी आहेत. ओमारीने तिची स्वतःची शाकाहारी कंपनी डिपॅलिशिअसही (Dipalicious) सुरू केली आहे. याद्वारे, वनस्पती आधारित/शाकाहारी जेवण, डिप्स आणि ज्यूस विकले जातात. त्याची आई सांगते की, ओमारी हा शाकाहारी शेफ आहे आणि अशा प्रकारे तो लोकांना प्राण्यांना इजा न करता चांगलं अन्न खाण्यासाठी आणि बनवण्यासाठी प्रेरित करू इच्छितो.
  करिअरसाठी शाळा सोडली ओमारी याने चॅनल आणि व्यवसाय सुरू केला तेव्हा तो शाळेत शिकत असे. मात्र, आता त्याने शाळेत जाणं बंद केलं आहे आणि पूर्णवेळ तो शाकाहारी शेफ म्हणून आपला वेळ करिअरला समर्पित केला आहे. तो प्राथमिक शिक्षण खाजगी शाळेतून घेतो. ओमारीची आई म्हणते की, तो फक्त पैशासाठी इतक्या वेगवेगळ्या व्यवसायात नाही, तर त्याला प्राण्यांची सुरक्षाही करायची आहे. तो मुलांशी संबंधित आजारांबद्दल जागरूकता देखील पसरवतो आणि शाकाहारी राहून लोकांना चांगलं जेवण देऊ इच्छितो. दरम्यान, मुलांना अशा प्रकारे ऑनलाइन व्यवसायात टाकणं म्हणजे त्यांची पिळवणूक असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. लेखक गिफी एनराईट यांनी अलीकडेच सांगितलं की, मुलांसाठी सामाजिक प्रभावशाली व्यक्ती बनणं हे खाणीत काम करण्यापेक्षा वेगळं नाही.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Food, Health, Vegan

  पुढील बातम्या