एका अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. हे ऐकताना तुम्हाला विचित्र वाटत असलं तरीही हे पूर्णपणे खरं आहे. ही घटना ब्रिटनमधील असून ही मुलगी ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची आई असल्याचं म्हटलं जात आहे. माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी गरोदर असताना तिचं वय केवळ 10 वर्ष होतं. मात्र, तिच्या कुटुंबीयांना बरेच दिवस याबाबतची माहिती नव्हती. एका सूत्राने द सनला याबाबतची माहिती दिली. ही बातमी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बाळ आणि आई दोघंही सुखरूप आहेत.
डेलीस्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, याआधी ब्रिटनमधील सर्वात कमी वयाची आई म्हणून टेरेसा मिडलटन यांना ओळखलं जात. त्यांनी 2006 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी बाळाला जन्म दिला होता. यासोबतच त्यांनी हेदेखील मान्य केलं होतं, की या बाळाचे वडील तिचा भाऊच होता. त्यानं तिच्यावर बलात्कार केला होता.
द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात कमी वयाच्या आई-वडिलांचा रेकॉर्ड 13 वर्षीय पिता आणि 12 वर्षीय महिलेच्या नावावर होता. 2014 मध्ये या महिलेनं बाळाला जन्म दिला होता. लहान वयातच बाळांना जन्म दिल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो.
जगातील सर्वात कमी वयाची आई मीरा मीडिया नावाची एक पेरू येथील मुलगी होती. 1939 मध्ये तिनं जेव्हा बाळाला जन्म दिला तेव्हा ती केवळ पाच वर्ष आणि सात महिन्यांची होती. तिच्या आई-वडिलांना वाटलं, की तिला ट्यूमर आहे, मात्र तिला रुग्णालयात घेऊन गेले असता, असं समोर आलं की ती सात महिन्यांची गर्भवती आहे.