मुंबई, 28 मे : लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या कला सादर करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत आहे. पण त्यामध्येही कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून युझर्सनी अनेक व्हिडीओ अपलोड करायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान दोन छोट्या भावांची जोडी मात्र सोशल मीडियावर तुफान लाईक्स आणि कमेंट्स मिळवून हिट झाली. याचं कारणही तितकच खास आहे. या दोन भावांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मराठी आणि हिंदी गाणाऱ्यांनी त्यांनी युझर्सची मनं जिंकली. सध्या ‘जरा होले होले…’ आणि ‘रुपेरी वाळूनत मनाच बनात ये ना’ ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहेत. मंजेश्वर ब्रदर्स या नावानं त्यांनी यूट्यूब चॅनलही सुरू केला आहे. या चॅनलवर 6 व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत.
त्यांच्या या यूट्यूब चॅनल जवळपास 7.84 हजार युझर्सनी subscriber केला. सगळ्याच व्हिडीओंना जवळपास 15 ते 20 हजारहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. त्यांच्या निरागस आणि सूरेल गाण्यानं रसिकांच्या मनावर भुरळ घातली आहे.
कोण आहेत हे दोन भाऊ? ऑस्ट्रेलियामधील रहिवासी असलेल्या सपना आणि अमेय दाम्पत्यांची ही दोन मुलं आहेत. अर्जुन आणि अर्णव अशी यांची नावं. यांचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असला तरी त्यांना हिंदी आणि मराठी गाण्यांची गोडी निर्माण झाली. गाणं हा जणू त्यांचा छंद असल्यानं सतत गुणगुणाऱ्या या चिमुकल्यांचे व्हिडीओ काढण्याची कल्पना सुचली. मग लॉकडाऊनच्या काळात दाम्पत्यानं यूट्यूब व्हिडीओ सुरू केला आणि या दोन्ही भावांची गाणी त्यावर अपलोड केली. Manjeshwar Brothers या नावानं त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलला 7.84 हजार लोकांनी सबस्क्राइब केलं आहे. या लॉकडाऊनमध्ये दोन भावांच्या सूरेल गाण्यानं लाईक्स तर मिळवलेच पण कौतुकाचा वर्षावही झाला आणि सोशल मीडियावर लहान वयातच गाण्यामुळे जास्त प्रसिद्ध होण्याचा मानही मिळाला. संपादन- क्रांती कानेटकर