मराठी बातम्या /बातम्या /विदेश /बॉयफ्रेंडला बोलावलं घरी, गर्लफ्रेंडच्या आईला पाहून बसला धक्का, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

बॉयफ्रेंडला बोलावलं घरी, गर्लफ्रेंडच्या आईला पाहून बसला धक्का, कारण ऐकून वाटेल आश्चर्य

तरुणानं जेव्हा गर्लफ्रेंडच्या आईला पाहिलं, तेव्हा काय करावं, हे त्याला समजेना. आपली ही व्यथा तरुणाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तरुणानं जेव्हा गर्लफ्रेंडच्या आईला पाहिलं, तेव्हा काय करावं, हे त्याला समजेना. आपली ही व्यथा तरुणाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तरुणानं जेव्हा गर्लफ्रेंडच्या आईला पाहिलं, तेव्हा काय करावं, हे त्याला समजेना. आपली ही व्यथा तरुणाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नवी दिल्ली, 5 डिसेंबर: गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला आपल्या घरी (Girlfriend called home) बोलावलं आणि आईवडिलांची ओळख करुन दिली. साधारणपणे जेव्हा एखाद्या तरुण आपल्या गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना (Parents of girlfriend) पहिल्यांदा भेटायला जातो, तेव्हा त्याच्या मनात टेन्शन असतं. मुलीचे आईवडिल आपल्याला काय म्हणतील, आपल्याशी कसे (Anxiety before meeting) वागतील, या नात्याविषयी त्यांच्या मनात काय विचार असतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. मात्र रेडिटवर एका तरुणाने शेअर (Strange experience) केलेला स्वतःचा अनुभव म्हटलं तर धक्कादायक आणि म्हटलं तर अजब असाच होता.

गर्लफ्रेंडच्या आईला पाहून धक्का

या तरुणाने नाव जाहीर न करता आपला अनुभव शेअर केला आहे. आपल्या नव्या गर्लफ्रेंडनं भेटायला घरी बोलावल्यानंतर तरुण तिच्या घरी गेला. घरी गेल्यावर तरुणीने त्याची ओळख वडिलांसोबत करून दिली. त्यानंतर या तरुणासमोर गर्लफ्रेंडची आई आली. जेव्हा त्याने गर्लफ्रेंडच्या आईला पाहिलं, तेव्हा काय करावं, हेच त्याला कळेना.

आईसोबत होतं अफेअर

काही वर्षापूर्वी सध्याच्या गर्लफ्रेंडच्या आईसोबत तरुणाचं अफेअर होतं. वयाच्या 19 व्या वर्षी जेव्हा तो जिम ट्रेनर म्हणून काम करत होता, त्यावेळी गर्लफ्रेंडची आई जिममध्ये येत असे. त्यावेळी 40 वय असणारी तिची आई तिच्या फिटनेसमुळे पंचविशीत असल्याप्रमाणे वाटायची. त्या काळात दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि अफेअर सुरू झालं. मात्र काही काळानंतर आपल्या दोघांमध्ये वयाचं अंतर फारच जास्त आहे, असं सांगत तरुणीच्या आईनं हे नातं संपवलं होतं.

हे वाचा- एका सापाने केलं 7 कोटी रुपयांचं नुकसान; डोळ्यादेखत आगीत जळून खाक झालं भलंमोठं घर

तरुण पडला पेचात

आता ही बाब आपल्या गर्लफ्रेंडला सांगावी की नको, या पेचात आपण पडलो असल्याचं तरुणानं म्हटलं आहे. त्यानं सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केल्यानंतर अनेकांनी त्याला सल्ले दिले आहेत. जे घडलं, त्यात तुझी काहीच चूक नसल्यामुळे तू स्वतःला दोषी समजू नकोस, अशी समजूतही अनेकांनी काढली आहे. तर नैसर्गिकपणे नाती तुटत आणि जुळत असतात. त्याचे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही, असंही अनेकांनी म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Boyfriend, Girlfriend, Love story, Mother