Merdeka 118 हा टॉवर ज्या पद्धतीने बांधला गेला आहे, तो खरोखरच मलेशियाच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. सर्वात उंचावरून टॉवर पाहिल्यानंतर संपूर्ण शहराचे अतिशय सुंदर दृश्य दिसेल. 678.9 मीटर उंचीवरून खाली पाहणे भितीदायक असले तरी ते रोमांचकही असेल.
लंडनच्या शार्डच्या दुप्पट उंची असलेला हा टॉवर 2022 पर्यंत उघडला जाईल. दुबईतील बुर्ज खलिफा नंतर जगातील सर्वात उंच इमारत होण्याचा मान Merdeka 118 ला मिळाला आहे. त्याची उंची 2717 फूट म्हणजे 828 मीटर असेल.
जगातील चौथी सर्वात उंच इमारत सौदी अरेबियामध्ये अल्ब्राझ अल बेट क्लॉक टॉवर (1972 फूट) आहे. तर चीनमध्ये 1966 फूट उंचीचा पिंग पाचव्या क्रमांकावर आहे.
Merdeka 118 ला मेगाटॉल स्कायस्क्रॅपर म्हटलं जात आहे. हे स्टेडियम मेरडेकामध्ये बांधण्यात आलेलं आहे. कारण ही जागा 1957 मध्ये मलेशियाच्या स्वातंत्र्याची प्रतीक आहे. या टॉवरला ऑस्ट्रेलियाच्या Fender Katsalidis Architects या फर्मने डिझाइन केलेलं आहे.
इमारतीची रचना आकर्षक आहे आणि ती त्रिकोणी काचेच्या पटलांनी बनलेली आहे. हा आकार मलेशियाच्या पारंपारिक कला आणि हस्तकलेतून घेतला गेला आहे. हे टॉवर 2,78,709 चौरस मीटरच्या मजल्याच्या क्षेत्रात बांधला जात आहे. त्यात पर्यटकांना पाहण्यासारखं बरंच काही असणार आहे.
कार्यालये आणि हॉटेल्स व्यतिरिक्त या इमारतीमध्ये एक मॉल देखील असेल. त्यात ग्लासडोम बांधण्यात आला आहे. 3000 लोक सामावून घेऊ शकतील अशा इमारतीच्या आत टेक्सटाईल म्युझियम आणि मशीद देखील असणार आहे. (All Photos Credit- merdeka118.com)