Home /News /videsh /

निसर्गरम्य जागेतील हे सुंदर घर गेल्या 100 वर्षांपासून रिकामं, वाचा रहस्य

निसर्गरम्य जागेतील हे सुंदर घर गेल्या 100 वर्षांपासून रिकामं, वाचा रहस्य

घर तर सुंदर आहे, निसर्गरम्य ठिकाणी आहे; मात्र गेल्या 100 वर्षांत तिकडं कुणीच फिरकलेलं नाही. यामागे अनेक कारणं आहेत.

    रोम, 9 डिसेंबर: पर्वतांच्या कुशीत, निसर्गरम्य भागात (In the beautiful nature) असलेल्या एका सुंदर घरात (Beautiful home) गेल्या 100 वर्षांत (100 years) कुणीही राहिलेलं नाही. इटलीमध्ये (Italy) अतिविशाल डोलोमाईट पर्वतांच्या (Mountains) कुशीत हे घर बांधण्यात आलं आहे. जगात अशा अनेक वास्तू असतात, ज्या दिसायला फारच सुंदर असतात, मात्र तिथं कुणीही राहत नाही. काही वास्तू या त्यांच्याबाबत घडलेल्या काही घटनांमुळे चर्चेत येतात, तर काही वास्तूंबाबत समाजात गैरसमज पसरलेले असतात. त्यामुळे देखील लोक अशा वास्तूंपासून दूर राहतात. मात्र इटलीतील ही वास्तू मात्र वेगळ्यात कारणामुळे सध्या चर्चेत आहे. पहिल्या महायुद्धाचा संदर्भ ही वास्तू साधारण 100 वर्षांपेक्षा जुनी असावी, असा अंदाज आहे. हे घर सुंदर असलं तरी ते अत्यंत दुर्गम अशा डोंगरांच्या मध्यभागी बांधण्यात आलं आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात इटालियन सैनिकांनी तात्पुरत्या निवासासाठी ते बांधलं असावं, असा इथल्या नागरिकांचा अंदाज आहे. ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्यानं या घराचं बांधकाम केलं असावं, असा अंदाजदेखील काहीजण व्यक्त करत आहेत. समुद्रसपाटीपासून हे घर 9000 फूट उंचीवर आहे. सैनिकांना डोंगरात युद्ध लढत असताना आराम करण्यासाठी या घराची उभारणी करण्यात आली असावी, असं सांगितलं जातं. शिवाय, या घराचा वापर स्टोअर रुमसारखा होत असावा, असंही अभ्यासक सांगतात. सैनिक त्यांची शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा जपून ठेवण्यासाठी या घराचा वापर करत असावेत, असं सांगितलं जात आहे. कठीण वाट या घरापर्यंत पोहोचण्याची वाटदेखील बिकट आहे. लाकूड, दोरी आणि केबलचा वापर करून एक पूलदेखील इथं उभारण्यात आला आहे. या पुलावरून घराकडं जाता येतं. तिथं पोहोचण्याचा रस्ता आव्हानात्मक आहे. अनेक हौशी ट्रेकर या घरापर्यंत पोहोचतात आणि त्याची रचना पाहून आश्चर्यचकित होतात. हे वाचा - विकी -कतरिनाच्या लग्नाचा रेड कार्पेट Viral Video पाहून हसून लोटपोट व्हाल! काळजी घेण्याचं आवाहन या घरात कुणालाही राहण्याची परवानगी दिली जात नाही. हे घर 100 वर्षं जुनं असल्यामुळे त्यातील अनेक भाग सडले आहेत. त्यामुळे एखादा भाग कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. इथं राहण्याची कल्पनाही अनेकांसाठी भीतीदायक आहे
    Published by:desk news
    First published:

    Tags: Italy, War

    पुढील बातम्या