Home /News /videsh /

बाबो! या धार्मिक नेत्याच्या आहेत 1000 गर्लफ्रेंड, आता 1075 वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा

बाबो! या धार्मिक नेत्याच्या आहेत 1000 गर्लफ्रेंड, आता 1075 वर्ष खावी लागणार तुरुंगाची हवा

तुर्कस्तानमधील मुस्लिम धार्मिक नेता (Muslim televangelis) अदनान ओकतार (Adnan Oktar) याला लैंगिक शोषणाच्या 10 प्रकरणात 1075 वर्ष जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

    इस्तंबुल, 13 जानेवारी:  तुर्कस्तानमधील मुस्लिम धार्मिक नेता (Muslim televangelis) अदनान ओकतार (Adnan Oktar) याला लैंगिक शोषणाच्या 10 प्रकरणात 1075 वर्ष जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्तंबुलच्या (Istanbul) कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, तो नेहमी अर्धनग्न स्त्रियांच्या गराड्यात राहत असे. या बायकांना त्यानं Kittens असं नाव ठेवलं होतं. मनुष्याच्या जन्माची रहस्य, आणि परंपरागत विचारांचा उपदेश तो प्रवचनातून करत असे, या प्रवचनाच्या दरम्यानही त्याच्या सभोवताली अर्धनग्न स्त्रिया नृत्य करत असत. यामधील काही महिलांनी प्लॅस्टिक सर्जरी देखील केली होती. अदनानवर गंभीर आरोप अदनानला त्याच्यावरील गंभीर आरोपासाठी 1075 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ‘एनडीटीव्ही’च्या रिपोर्टनुसार लैंगिक गुन्हे, अल्पवयीन मुलींचं शोषण, फसवणूक त्याचबरोबर राजकीय आणि लष्करी हेरगिरीचा त्याच्यावर आरोप होता. त्याच्या संघटनेचे दोन कार्यकर्ते टरकान यावास आणि ओकटार बाबूना यांना क्रमश: 211 आणि 186 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (हे वाचा-छेड काढणाऱ्या रोमिओला चपलांनी बदडलं, तरुणीनं केलेल्या धुलाईचा पाहा VIDEO) सेक्स स्कँडलमध्ये झाली होती अटक अदनाला सर्वात प्रथम 1990 च्या दशकात सेक्स स्कँडलमध्ये अटक करण्यात आली होती. ऑलाइन A9 टेलिव्हिजन चॅनलनं त्याच्या कार्यक्रमांच प्रसारण 2011 साली सुरु केलं होतं. या कार्यक्रमात तो तुर्कस्तानच्या धर्मगुरुंवर टीका करत असे. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अखेर तुर्की सरकारनं तो कार्यक्रम बंद केला. त्यानंतर  अदनानला 2018 साली इस्तंबुल पोलिसांनी अटक केली होती. यावेळी  200 पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या जप्त अदनानवरील खटल्यांच्या सुनावणी दरम्यान एका महिलेनं त्यानं लैंगिक शोषण केल्याची साक्ष दिली होती. लैंगिक शोषण केल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या घेण्यासाठी अदनान महिलांना जबरदस्ती करत असे. पोलिसांनी त्याच्या घरातून 69 हजार गर्भनिरोधक गोळ्या हस्तगत केल्या आहेत. (हे वाचा-या राष्ट्राध्यक्षांनी सोडलं Whatsapp, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम) 1000 गर्लफ्रेंड! अदनाननं या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आपल्याला 1000 गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं होतं. महिलांबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण होतं. प्रेम हा एक मानवी गुण आहे, असा दावा त्यानं केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Turky

    पुढील बातम्या