मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ज्येष्ठांची काळजी घेण्याचा स्मार्ट उपाय! पडल्यानंतरही होणार नाही दुखापत

ज्येष्ठांची काळजी घेण्याचा स्मार्ट उपाय! पडल्यानंतरही होणार नाही दुखापत

संशोधकांनी  एक विशेष यंत्र (Special Device) तयार केलं आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिक पडणार असतील तर याची आधीच सूचना त्यांना मिळू शकते.

संशोधकांनी एक विशेष यंत्र (Special Device) तयार केलं आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिक पडणार असतील तर याची आधीच सूचना त्यांना मिळू शकते.

संशोधकांनी एक विशेष यंत्र (Special Device) तयार केलं आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिक पडणार असतील तर याची आधीच सूचना त्यांना मिळू शकते.

    मुंबई, 10 ऑगस्ट : ज्येष्ठ नागरिकांना (senior citizen)  आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. ठराविक वेळेला त्यांची आरोग्य तपासणी होणं आणि काही आजार झाले असतील तर वेळीच योग्य उपचार मिळणं खूप महत्त्वाचं ठरतं. बऱ्याचदा तोल जाऊन पडल्यामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल ऐकायला मिळत. अशावेळी सतत त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवं, अशी रास्त अपेक्षा असते; पण अनेक देशांत ते शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन नेदरलँड्समधील संशोधकांनी (Netherlands) एक विशेष यंत्र (Special Device) तयार केलं आहे. याद्वारे ज्येष्ठ नागरिक पडणार असतील तर याची आधीच सूचना त्यांना मिळू शकते तसंच त्यांना यामुळे कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजीही घेता येऊ शकते. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. ज्येष्ठांचा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी जगात सर्वाधिक पैसा नेदरलँड्सकडून खर्च केला जातो. याबाबतचे आकडे पाहिले असता याची कल्पना येते. 2019 मध्ये नेदरलँड्स सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीवर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) 4 टक्के खर्च केला आहे. डेन्मार्कमध्ये हाच आकडा 3.5 टक्क्यांवर आहे. हा निधी 2050 पर्यंत दुपटीवर जाण्याची शक्यता आहे. या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची जबाबदारीही देशातील ज्येष्ठांवरच आहे. नेदरलँड्स सरकारकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2040 पर्यंत देशात 75 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची संख्या 25 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. देशात केवळ ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर त्यांची काळजी घेणारे लोकही वयस्कर होत आहेत. अशा स्थितीत त्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन नवं डिव्हाईस तयार करण्यात आलं आहे. झोपाळ्यावरून पडताच शरीराचे दोन तुकडे झाले तरी तरुणी जिवंत; चमत्कारामुळे डॉक्टरही शॉक काय आहे उपाय? एका रिपोर्टनुसार, ज्येष्ठांची काळजी घेणं सोपं व कमी खर्चिक व्हावं, यासाठी नेदरलँड्स सरकार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) माध्यमातून विविध सुविधा पुरवणाऱ्या मॉडेलवर काम करत आहे. त्यानुसार, ‘स्मार्ट फ्लोर’ (Smart Floor) नावाचं डिव्हाईस तयार करण्यात आलं आहे. या डिव्हाईसला पट्टा आहे त्याला एअरबॅग जोडलेल्या आहेत. हे डिव्हाईस वापरणारा ज्येष्ठ नागरिक फिरत असताना तोल जाऊन पडणार असेल तर डिव्हाईसकडून याची पूर्वसूचना त्या ज्येष्ठाला दिली जाईल. या अलर्टनंतर बेल्टला जोडलेल्या एअरबॅग्जमध्ये हवा भरली जाईल आणि आणि पडल्यानंतरही ज्येष्ठांना दुखापत होणार नाही. त्या एअरबॅग्ज जेष्ठांना जमिनीवर पडण्यापासून आणि इजा होण्यापासून वाचवतील. या डिव्हाईसमुळे ज्येष्ठांमध्ये वयामुळे तोल जाऊन होणाऱ्या हिप फ्रॅक्चरचा धोका कमी करता येईल. '…म्हणून लग्नापूर्वीच पळून गेली नवरी', सोशल मीडियावर सांगितलं कारण बालपण आणि म्हातारपण हे आयुष्याचे असे दोन टप्पे आहेत जिथे सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पालक सक्षम असतात. परंतु, धकाधकीच्या जीवनात वयस्कर आई-वडिलांची काळजी घेताना मुलांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नेदरलँड्सने ज्येष्ठांच्या काळजीसाठी तयार केलेल्या डिव्हाईसचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
    First published:

    Tags: Senior citizen, World news

    पुढील बातम्या