Home /News /videsh /

'…म्हणून लग्नापूर्वीच पळून गेली नवरी', सोशल मीडियावर सांगितलं कारण

'…म्हणून लग्नापूर्वीच पळून गेली नवरी', सोशल मीडियावर सांगितलं कारण

एका तरुणी लग्नाच्या (Marriage) नियोजित तारखेच्या आठवडाभर आधी पळून गेली. त्यानंतर सोशल मीडियावर तिनं या सर्व प्रकरणाचा खुलासा केला आहे.

    मुंबई, 6 ऑगस्ट : लग्नाचं घर म्हटलं की, चार-दोन महिने आधीच लगबग सुरू होते. लग्नाची तारीख जसजशी जवळ येते तसं नवरी-नवरदेव यांची लग्नसमारंभाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचते. कारण त्या दिवशीच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र बिंदू नवविवाहित जोडपंच राहणार असतं; पण लग्नात त्या जोडप्याऐवजी दुसऱ्या कोणाला महत्त्व मिळणार असेल तर ते कोणालाही आवडणार नाही. असंच काहीसं एका तरुणीच्या बाबतीत घडलं आहे. स्वत:च्या लग्न समारंभात बहीण व तिच्या बॉयफ्रेंडला अधिक महत्त्व मिळू नये म्हणून एका तरुणीने चक्क ठरलेल्या तारखेच्या एक आठवडा आधी नियोजित वरासोबत पळून जात विवाह उरकला. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. सोशल मीडिया साइट रेडिटवर (Reddit) संबंधित नववधूनेच तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तरुणीचा विवाह निश्चित झाला होता. तिच्या कुटुंबातील सर्वजण विवाहाची तयारी करत होते. लग्न समारंभात वधूची बहीण तिच्या बॉयफ्रेंडला प्रपोज करणार होती. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळीचं लक्ष तिची बहीण व बॉयफ्रेंडवरच केंद्रीत होऊ नये व सर्व प्रसिद्धी एकट्या बहिणीलाच मिळू नये म्हणून त्या तरुणीने हे पाऊल उचलल्याचं तिनं स्वत: रेडिटवर सांगितलं आहे. विशेष म्हणजे आपण पतीसोबत हनिमूनला गेल्यानंतर ही बाब कुटुंबीयांना सांगावी, असं तिनं मित्रमंडळींना म्हटलं आहे. Video: मशीन समजून रोबोला लाथ मारणं तरुणाला पडलं महागात; 3 रोबोंनी घेरून केली चांगलीच धुलाई बॉयफ्रेंडला प्रपोज करत सर्वांना सरप्राईज देण्याचा बहिणीचा विचार होता; पण त्या तरुणीला हे मान्य नव्हतं. त्यामुळे होणाऱ्या पतीशी बोलून तिने आठवडाभर आधीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिल व बहिणीला ही बाब न सांगता तिने तिचे मित्र, चुलत भाऊ आणि मावशीला लग्नासाठी आमंत्रित केलं. हनिमूनवर जाईपर्यंत लग्नाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू नये, असं त्या तरुणीने नातेवाईकांना सांगितलं. काही दिवसांनंतर त्या तरुणीने आईला लग्नाबद्दल माहिती दिली. तरुणीच्या निर्णयाने कुटुंबीय नाराज तरुणीने होणाऱ्या पतीसोबत पळून जाऊन लग्न केल्याने कुटुंबीय खूप नाराज झाले. लग्नाच्या तयारीवर भरपूर खर्च झाल्याने आई आता भरपाई देण्याची मागणी करत असल्याचा दावा त्या तरुणीने रेडिटवर केला. बहिणीबद्दल मनात काहीही राग, द्वेष, असूया नाही; पण लग्नाचा दिवस अत्यंत विशेष असतो. त्यावेळी बहिणीने काही नियोजन केलं असेल तर तिने सांगायला हवं होतं, असं नवविवाहित तरुणीचं म्हणणं आहे. |लग्न समारंभ कायम स्मरणात राहावा म्हणून याची जोरदार तयारी केली जाते. व्हिडिओ, फोटो, सजावट, मेकअप, कपडे या सर्वांवर भरपूर खर्चही केला जातो. त्या दिवशी सर्वांनी आपल्याकडेच सर्वांचं लक्ष असायला हवं असं वधू-वराला वाटत असतं. पण तसं होत नसल्याने रागात या तरुणीने उचलेलं पाऊल सर्वांना आश्चर्यचकीत करणारं आहे.
    First published:

    Tags: Bride, Marriage, Social media

    पुढील बातम्या