मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'या' देशाचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल कट्टर मित्र अमेरिकेशी संघर्ष करण्यास तयार

'या' देशाचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल कट्टर मित्र अमेरिकेशी संघर्ष करण्यास तयार

हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेशी युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर इस्रायलने (Israel) आपल्या आणखी एका शत्रूचा बंदोबस्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यावेळी अमेरिकेशी संघर्ष करण्याचीही इस्रायलची तयारी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 जून : हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेशी युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर इस्रायलने (Israel) आपल्या आणखी एका शत्रूचा बंदोबस्त करण्याची तयारी सुरु केली आहे. इस्रायलचे पंतप्राधन बेंजामीन नेतन्याहू  (Benjamin Netanyahu) यांनी याबाबतचे वक्तव्य  केले आहे. या विषयावर प्रसंगी इस्रायलचा सर्वात कट्टर मित्र असलेल्या अमेरिकेशी (USA) देखील संघर्ष करण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पश्चिम आशियातील (West Asia) इराण (Iran) हा देश इस्रायलचा स्थापनेपासून शत्रू आहे. इराणच्या अण्वस्त्र क्षमतेची इस्रायलला चिंता आहे. त्यामुळे त्याची ही क्षमता नष्ट करण्याची तयारी इस्रायलने सुरू केली आहे.नेतन्याहू यांनी याबाबत सांगितले की, "अण्वस्त्र सज्ज इराण इस्रायलसाठी सर्वात मोठा संभाव्य धोका आहे. इस्रायल यापूस स्वत:चे रक्षण करण्यासाठी पूर्ण सज्ज आहे. अमेरिका  आणि अन्य देशांनी इराणसोबत 2015 साली केलेल्या कराराची अंमलबजावणी केली तरी आमच्या या भूमिकेत फरक पडणार नाही.' इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादचे (Mossad) नवे प्रमुख डेव्हिड बार्निया यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

नेतन्याहूने या विषयावर बोलताना सांगितले की, "मला खात्री आहे की, याची गरज पडणार नाही. पण, आम्हाला आमचा महान मित्र अमेरिकेसोबत तणाव आणि सध्याचा धोका नष्ट करण्यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली तर आम्ही धोका नष्ट करु.' इराणने यापूर्वीच इस्रायलवर अणूशास्त्रज्ञांची हत्या करणे आणि अण्विक क्षमतेचं नुकसीान करण्याचा आरोप केला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात 2015 साली झालेल्या कराराची अंमलबजावणी करण्याची चर्चा सुरु असतानाच नेतन्याहू यांनी हा इशारा दिला आहे.

अमेरिका-इस्रायल यांच्यात होणार चर्चा

इस्रायलचे संरक्षमंत्री बेनी गॅट्झ याच आठवड्यात वॉशिंग्टला जाणार आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे संरक्षमंत्री लॉयड जे ऑस्टिन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांच्याशी इराणच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीच यापूर्वीच माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donalad Trump) यांनी 2018 साली केलेला करार फेटाळला आहे.

गलवानचं सत्य सांगणे महाग पडले, चीन सरकारनं ब्लॉगरची केली जेलमध्ये रवानगी

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा इस्रायलने वारंवार विरोध केला आहे. तर याचा वापर शांततापूर्म कामासाठी असल्याचा इराणचा दावा आहे.

First published:

Tags: Iran, Israel, United States of America