मराठी बातम्या /बातम्या /विदेश /गलवानचं सत्य सांगणे महाग पडले, चीन सरकारनं ब्लॉगरची केली जेलमध्ये रवानगी

गलवानचं सत्य सांगणे महाग पडले, चीन सरकारनं ब्लॉगरची केली जेलमध्ये रवानगी

भारत आणि चीन (India - China) यांच्यात गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षाची खरी माहिती दिल्याची शिक्षा चीनमधील ब्लॉगरला झाली आहे.

भारत आणि चीन (India - China) यांच्यात गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षाची खरी माहिती दिल्याची शिक्षा चीनमधील ब्लॉगरला झाली आहे.

भारत आणि चीन (India - China) यांच्यात गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षाची खरी माहिती दिल्याची शिक्षा चीनमधील ब्लॉगरला झाली आहे.

मुंबई, 2 जून: भारत आणि चीन (India - China) यांच्यात गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात (Galwan Valley) झालेल्या संघर्षाची खरी माहिती दिल्याची शिक्षा चीनमधील ब्लॉगरला झाली आहे. चीन सरकारने त्याच्यावर सरकारी वक्तव्यापेक्षा वेगळी माहिती दिल्याचा ठपका ठेवलाय. किउ जीमिंग असं या ब्लॉगरचं नाव असून त्याचे 25 लाखांपेक्षा जास्त ब्लॉगर्स आहेत. गलवानची सत्य माहिती ब्लॉगमध्ये मांडल्याप्रकरपणात त्याला आठ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 'शहिदांची बदनामी' करण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

'ग्लोबल टाईम्स' ने दिलेल्या वृत्तानुसार क्रिमिनल लॉमधील नव्या संशोधनानंतरचे हे पहिलेच प्रकरण आहे. ऑनलाईन विश्वात Labixiaoqiu नावाने हा ब्लॉगर प्रसिद्ध आहे. पूर्व चीनमधील जिंआगसू प्रांतामधील नानजिंग कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोर 10 दिवसांच्या आता चीन मधील प्रमुख न्यूज पोर्टल्स आणि राष्ट्रीय माध्यमाच्या माध्यमातून सार्वजनिक माफी मागण्याचा आदेश देखील कोर्टाने दिला आहे.

ब्लॉगरची प्रतिक्रिया काय?

या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या माहिती नुसार, 'या ब्लॉगरने त्याचा गुन्हा मान्य केला असून पुन्हा ही चूक करणार नसल्याचे आश्वासन कोर्टाला दिले आहे. मला स्वत:ची लाज वाटते. या घटनेचा मला खेद आहे, ' असे त्याने सांगितले आहे. चीनमधील सरकारी सीसीटीव्हीमधील एका कार्यक्रमात त्यानं माफी मागितली आहे. गलवानमध्ये झालेल्या संघर्षात अधिकृत आकडेवारीपेक्षा जास्त सैनिक मारले गेले, असा दावा त्याने केला होता.

पाकिस्ताननही आणली स्वत:ची PakVac कोरोना लस, सर्व माहिती मात्र लपवली

किउ जीमिंगच्या या दाव्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सरकारी न्यूज एजन्सी सिन्हूआने त  त्याच्यावर आरोप केला होता. 'सनसनाटी दावे करुन नायकांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणे, राष्ट्रीय हिताच्या भावनांना धक्का देणे आणि राष्ट्रभक्तांच्या मनात विष कालवणे,' असे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते.

First published:

Tags: China, International, World news