डाव्होस, 20 जानेवारी : स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त स्वित्झर्लंडमधील डाव्होसमध्ये जगभरातील नेते, उद्योगपती, सेलिब्रिटींनी उपस्थिती लावलीय. दरम्यान, तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कालावधीतच वेश्याव्यवसायात मोठी वाढ झाली असल्याचंही समोर आलं आहे. डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं पाच दिवसांचे वार्षिक अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डाव्होसमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाल्याचं न्यूयॉर्क पोस्टने म्हटलं आहे.
बिल्ड या जर्मन वृत्तपत्राने एका वेश्येचा दाखला देत वेश्याव्यवसायाला प्रचंड मागणी अधिवेशन काळात वाढली असल्याचं म्हटलं आहे. डाव्होसपासून १०० मैल अतंरावर असणलेल्या अरगाऊ या शहरात एक एस्कॉर्ट सर्व्हिस चालवण्यात येते. ही सर्व्हिस देणाऱ्या महिलेने या ठिकाणी पहिल्याच दिवशी ११ जणांचे बूकिंग आणि २५ जणांनी चौकशी केली असल्याचं सांगितलं.
हेही वाचा : पाकिस्तानमधील अन्नधान्य संकटाची तीव्रता वाढली? भयानक परिस्थिती दाखवणारा VIDEO
काही कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी स्वत:सह त्यांच्योसबत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही हॉटेलमध्ये पार्टीसह एस्कॉर्टची सोय केल्याची माहिती एका मॅनेजरने दिली. एका वेश्येने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशन काळातील अनुभवही ट्विटरवर शेअर केला आहे. तर काही वेश्यांनी जगातील विविध देशातले नेहमीचे ठरलेले ग्राहक असल्याचंही सांगितलंय. स्वित्झर्लंडमध्ये जेव्हा ते येतात तेव्हा आमच्याशी संपर्क करतात अशी माहिती त्यांनी दिल्याचं न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे.
स्वित्झर्लंडमध्ये वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता आहे. त्यामुळे तिथे अधिकृतपणे एस्कॉर्ट सेवा पुरवण्यात येते. आता वर्ल्ड इकॉनिमिक फोरमच्या अधिवेशन काळात जगभरातील हजारो नेते, उद्योजक डाव्होसमध्ये पोहोचले होते. अशा वेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांकडून अडीच हजार डॉलर्सपर्यंत दर आकारला जात असल्याचंही न्यूयॉर्क पोस्टने म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Economy