जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Turkey नाही तर Turkiye 'या' कारणामुळे एर्दोगन सरकारनं बदललं देशाचं नाव, UN नं दिली मान्यता

Turkey नाही तर Turkiye 'या' कारणामुळे एर्दोगन सरकारनं बदललं देशाचं नाव, UN नं दिली मान्यता

Turkey नाही तर Turkiye 'या' कारणामुळे एर्दोगन सरकारनं बदललं देशाचं नाव, UN नं दिली मान्यता

आशिया आणि युरोप या दोन खंडामध्ये पसरलेल्या तुर्कस्तान म्हणजेच तुर्की (Turkey) या देशानं स्वत:चं नाव बदललं आहे. संयुक्त राष्ट्रानंही नव्या नावाला मान्यता दिली आहे.

    मुंबई, 3 जून : आशिया आणि युरोप या दोन खंडामध्ये पसरलेल्या तुर्कस्तान म्हणजेच तुर्की (Turky) या देशानं स्वत:चं नाव बदललं आहे. आता या देशाचं  नाव तुर्किये (Turkiye) असं असेल. तुर्कियेचे अध्यक्ष  रेसेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यांच्या या निर्णयाला संयुक्त राष्ट्रानं (UN) मान्यता दिली आहे. मोठ्या प्रयत्नांनंतर बदल तुर्कियेचे अध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्की संस्कृतीला महत्त्व देण्यासाठी ‘तुर्किये’ या नावाचा वापर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विदेशात निर्यात होणाऱ्या सर्व उत्पादनावर ‘मेन इन तुर्की’ च्या जागी ‘मेड इन तुर्कस्तान’ असा बदल करण्यात आला होता. सर्व सरकारी मंत्रालयानंही त्यांच्या अधिकृत कागदपत्रामध्ये ‘तुर्किये’ लिहेणे सुरू केले होते. यावर्षाच्या सुरूवातीपासूनच सरकारनं इंग्रजी नाव बदलण्यासाठी प्रचार सुरू केला होता. पर्यटन विभागाच्या व्हिडीओतही ‘हॅलो तुर्किये’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. एर्दोगन सरकारची ‘तुर्किये’ हा ब्रँड नेम निर्माण करण्याची इच्छा आहे. टर्की किंवा तुर्की हा शब्द हा नकारात्मक मानला जातो. त्यामुळे 1923 साली हा देश स्वतंत्र झाल्यापासून त्याला स्थानिक नागरिकांकडून ‘तुर्किये’ असं म्हंटलं जात असे. एर्दोगन देखील गेल्या अनेक दिवसांपासून ‘तुर्किये’ नावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता संयुक्त राष्ट्राच्या निर्णयानंतर त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. तुर्कियेच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुखानं सांगितलं की, ‘आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्किये नावाचा वापर करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तुर्कीतील नागरिकांना ‘तुर्किये’ हे देशाचं नाव आवडतं. जगभरातील नागरिकांनी याच नावानं आमच्या देशाला ओळखावं अशी त्यांची अपेक्षा आहे.’ पुतीन यांना कॅन्सर? बायडेन-जिनपिंगही आजारी, जगभरातल्या या दिग्गज नेत्यांची तब्येत ढासळलीये? काय आहे अर्थ? तुर्की या शब्दाला नकारात्मक अर्थ आहे. तुर्कीला इंग्रजीमध्ये टर्की असे म्हंटले जाते. टर्कीचा अर्थ मूर्ख असाही होतो. त्याचबरोबर ‘अपयशी’ असा देखील याचा अर्थ आहे. त्याचबरोबर टर्की हे पक्षाचं देखील नाव आहे. या सर्व कारणांमुळे नकारात्मक प्रचार टाळण्यासाठी एर्दोगन सरकारनं देशाचं नाव बदललं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात