रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (69) हे त्यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या अत्यंत गुप्त राखतात. त्यामुळे त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून त्यांच्या तब्येतीबाबत अंदाज लावले जात आहेत. अलीकडच्या अनेक रिपोर्ट्समध्ये त्यांना थायरॉईड कॅन्सर असल्याचं सांगण्यात आलं आहे. काही रिपोर्ट्समध्ये त्यांना पार्किन्सन्सच्या आजारानं ग्रासल्याचंही म्हटलं आहे.
नुकतेच पुतिन यांचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. पहिला व्हिडिओ बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्याशी हस्तांदोलन करतानाचा आहे. व्हिडिओमध्ये लुकाशेन्कोची वाट पाहत असलेल्या पुतिनचा हात थरथरत होता. थरथर थांबवण्यासाठी, तो त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि लुकाशेन्को यांच्याकडे जाताना अडखळलेही.
मार्च 2019 मध्ये इटलीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या चालण्याच्या पद्धतीमुळे सर्वजण थक्क झाले होते. नंतर जेव्हा ते फ्रान्सला पोहोचले तेव्हा त्यांना बसण्यासाठीही मदत घ्यावी लागली. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2020 मध्ये शेन्झेन येथे भाषणादरम्यान त्यांचा आवाज खूपच मंद होता आणि त्यांना सतत खोकला येत होता. त्यानंतर ते आजारी असल्याची चर्चा आणखी वाढली होती.
79 वर्षीय अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना वृद्धत्वाच्या आजारांनी घेरले आहे. काही रिपोर्ट्समध्ये ते डिमेन्शियाचे रुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. बिडेन यांना 1988 मध्ये 'ब्रेन एन्युरिझम' देखील झाला होता, ज्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र, ते पुन्हा घडण्याची फक्त 20% शक्यता आहे. बिडेन यांचं पित्ताशयही काढून टाकलं आहे.
याआधी, किम जोंग उन यांनी 2021 मध्ये एका महिन्यासाठी कोणतीही सार्वजनिक हजेरी लावली नाही आणि त्यांच्या अनुपस्थितीनंतर त्याचं सुमारे 20 किलोग्राम वजन कमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यामुळे त्याच्यावर ओपन-हार्ट सर्जरी झाल्याबद्दल मोठ्या अफवा पसरल्या. परंतु उत्तर कोरियाचे अधिकारी म्हणतात की, त्यांचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही आजाराने ग्रस्त नाहीत.