मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'माझ्यासाठी प्रार्थना करा'; तालिबानींपासून बचावासाठी बुरख्यात लपून राहणाऱ्या महिला पत्रकारानं सांगितलं हादरवणारं वास्तव

'माझ्यासाठी प्रार्थना करा'; तालिबानींपासून बचावासाठी बुरख्यात लपून राहणाऱ्या महिला पत्रकारानं सांगितलं हादरवणारं वास्तव

आपण बुरखा घालून तालिबान्यांपासून लपून फिरत असल्याचंही (Afghan Journo hiding from Taliban) तिने या मुलाखतीत म्हटलं आहे. नूरीने सर्वांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे.

आपण बुरखा घालून तालिबान्यांपासून लपून फिरत असल्याचंही (Afghan Journo hiding from Taliban) तिने या मुलाखतीत म्हटलं आहे. नूरीने सर्वांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे.

आपण बुरखा घालून तालिबान्यांपासून लपून फिरत असल्याचंही (Afghan Journo hiding from Taliban) तिने या मुलाखतीत म्हटलं आहे. नूरीने सर्वांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे.

    काबुल 13 ऑगस्ट : अफगाणिस्तान आणि तालिबानमधील गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध आता आणखी गंभीर झालं आहे. एक एक करत देशातील अनेक शहरं तालिबानच्या (Afghanistan Taliban Situation) ताब्यात गेली आहेत. अमेरिकेने आधीच तिथून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रपती अशरफ घनी (Ashraf Ghani) हे मदतीसाठी दुसऱ्या देशांकडे धावत आहेत. देशात सुरू असलेल्या युद्धामुळे अफगाणिस्तानातील महिलांची (Women in Afghanistan) परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. एका महिला पत्रकाराने अफगाणिस्तानमधील स्थिती (Afghanistan situation) सर्वांसमोर मांडली आहे.

    हिकमत नूरी (Hikmat Noori) नावाच्या या तरुणीने द गार्डियन (The Guardian) या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देशातील परिस्थिती सांगितली. तसेच, आपण बुरखा घालून तालिबान्यांपासून लपून फिरत असल्याचंही (Afghan Journo hiding from Taliban) तिने या मुलाखतीत म्हटलं आहे. नूरीने सर्वांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले आहे.

    Asteroid Bennu पृथ्वीवर धडकणार? होत्याचं नव्हतं करू शकतो हा लघुग्रह

    तालिबानने अफगाणिस्तानच्या उत्तर भागातील बरीच शहरं ताब्यात (Taliban captured Afghan cities) घेतली आहेत. यातील एका शहरात नूरी राहत होती. तालिबानमुळे ती आपलं घर सोडून पळून गेली. ‘आठवडाभरापूर्वीच मी एक पत्रकार (Journalist hikmat Noori) होते. आता परिस्थिती अशी आहे, की मी कोण आहे आणि कुठून आले हे कोणालाही सांगू शकत नाही. मी पत्रकार असूनही स्वतःच्या नावाने लिहू शकत नाही. अवघ्या काही दिवसांमध्येच माझं संपूर्ण पूर्वायुष्य नष्ट झालं आहे. मी घरी जाऊ शकेन का, माझ्या आई-वडिलांना पुन्हा पाहू शकेन का, आणि घरी नाही गेले तर कुठे जाऊ हे सगळे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.’ असं नूरी गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत (Hikmat Noori interview) म्हणते.

    नूरीने सांगितले, ‘घर सोडण्याचा निर्णय हा अचाकन घेतला गेला, किंबहुना घ्यावा लागला. आमचा संपूर्ण प्रांत तालिबानने आपल्या ताब्यात घेतला होता. देशात सरकारचं नियंत्रण केवळ काही विमानतळं आणि पोलीस कार्यालयांवरच राहिलं आहे. मी एक 22 वर्षांची तरुणी असल्यामुळे मला जास्त धोका आहे. तालिबानचे दहशतवादी घराघरांमधून तरुण मुलींना आणि महिलांनाही उचलून घेऊन जात आहेत. ते मला आणि माझ्या साथीदारांना शोधत येतील हेही मला माहिती आहे.’

    नूरी पुढे सांगते, ‘मागील वीकेंडला मला माझ्या मॅनेजरचा फोन आला. त्यांनी मला सांगितले, की कोणत्याही अनोळखी नंबरवरुन फोन आल्यास तो घेऊ नको. आपण (पत्रकार), विशेषतः महिलांनी लपून बसायला हवं, किंवा शक्य झालं तर शहर सोडून पळून जायला हवं. त्यानंतर मी जेव्हा पॅकिंग करत होते तेव्हाच बाहेरुन गोळ्यांचा आणि रॉकेट्सचा आवाज येत होता. विमानं आणि हेलिकॉप्टर्स इमारतीवरुन जात होते. आमच्या घराच्या समोरच्या गल्लीतच लढाई सुरू होती. मी माझा फोन आणि एक चादरी (बुरख्यासारखा पूर्णपणे अंग आणि चेहरा झाकणारा पेहराव) घेतली आणि निघाले. माझ्या काकांनी मला सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. माझ्या कुटुंबातील इतर सदस्य बाहेर पडू शकले नाहीत. शहरात फोन सर्व्हिस बंद झाल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क तुटला.’

    ‘घराच्या बाहेर पडल्यानंतर सगळीकडे तालिबानीच दिसत होते. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये सगळीकडे. माझ्याकडे चादरी होती त्यामुळे मला ते ओळखू शकत नव्हते. मात्र, तरीही चालताना माझे पाय भीतीने लटपटत होते. आम्ही थोडं पुढे जाताच एक रॉकेट आमच्या शेजारी येऊन कोसळलं. मी ओरडून रडू लागले. आजूबाजूला महिला आणि लहान मुलं रडत वाट फुटेल तिकडे धावत होती. मला असं वाटलं की समुद्रात भयंकर वादळात अडकलेल्या एका छोट्याशा नावेत आम्ही आहोत. आम्ही कसंतरी काकांच्या गाडीजवळ पोहोचलो, आणि त्यांच्या घराकडे निघालो. पुढे एका ठिकाणी चेकपॉईंटवर आम्हाला अडवलं. माझ्या आयुष्यातील हा सर्वात भीतीदायक प्रसंग होता. नशिबाने तालिबान्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करुन काकांची चौकशी सुरू केली. काकांनी त्यांना सांगितले, की आम्ही हेल्थ सेंटरला आलो होतो, आणि आता घरी जात आहोत. कसंतरी आम्ही तिथून निघालो.’

    अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील घटना

    ‘काकांच्या गावी पोहोचूनही आम्ही सुरक्षित नव्हतो. त्यांचं गावही तालिबानने ताब्यात घेतलं होतं. शिवाय कित्येक स्थानिकही तालिबानच्या बाजूने झाले होते. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर शेजाऱ्यांना समजलं की मी तिथे लपून बसले आहे. ते म्हणाले की तालिबानला तू तुझ्या घरी नसल्याचं समजलं आहे. त्यांना जर हे समजलं की तू इथे आहेस, तर इथल्या सर्वांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे मग मी तिथून दुसऱ्या एका नातेवाईकाकडे जाण्यासाठी निघाले. आम्ही चालतच तिथून निघालो. मी शक्यतो मुख्य रस्ते टाळून गावांच्या आतून प्रवास करत आहे, जेणेकरुन तालिबानपासून लपून राहता येईल. आता मी ज्या गावात आहे तिथे ना फोन सिग्नल आहे, ना पाणी, ना वीज. माझा जगाशी संपर्क तुटलाय. माझ्या ओळखीच्या ज्या महिला आणि मुली होत्या, त्यादेखील सुरक्षित ठिकाणी पळून गेल्या आहेत.’

    ‘मीडियामधील माझ्या सर्व महिला साथीदार घाबरलेल्या आहेत. कित्येक जणी शहर सोडून पळून गेल्या आहेत, तर कित्येक तशा प्रयत्नात आहेत. आम्ही पत्रकारिता करताना तालिबान विरुद्ध बोललो होतो, त्यामुळे ते आम्हाला शोधत आहेत. आम्ही सर्व बाजूंनी घेरलो गेलो आहोत. सध्या तरी मी फक्त लपून राहू शकते, आणि या प्रांतातून लवकरच बाहेर निघता येईल अशी आशा ठेऊ शकते. प्लिज, माझ्यासाठी प्रार्थना करा.’, असं नूरी आपल्या मुलाखतीत म्हणते आहे.

    नूरीच्या या मुलाखतीमुळे तालिबानमधील एकूणच परिस्थितीचा अंदाज येतो. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) या भारतीय फोटोजर्नलिस्टची तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली होती. यातूनच नूरीचं आयुष्य किती धोक्यात आहे हे आपल्याला कळू शकतं.

    First published:

    Tags: Crime news, Taliban, Viral news