मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पात्रतेपेक्षा वरचढ ठरली बॉडी फिगर, लठ्ठपणामुळे महिला झाली REJECT

पात्रतेपेक्षा वरचढ ठरली बॉडी फिगर, लठ्ठपणामुळे महिला झाली REJECT

काम करण्यासाठी आवश्यक (Woman rejected by company for the reason of over weight) असणारी पात्रता आणि कौशल्यं यांच्यापेक्षाही शारीरिक ठेवण आणि फिगर याच बाबी महत्त्वाच्या ठरत असल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 25 नोव्हेंबर: काम करण्यासाठी आवश्यक (Woman rejected by company for the reason of over weight) असणारी पात्रता आणि कौशल्यं यांच्यापेक्षाही शारीरिक ठेवण आणि फिगर याच बाबी महत्त्वाच्या ठरत असल्याचं समोर आलं आहे. एका महिलेकडं जॉबसाठी (Skills and abilities) आवश्यक असणारे सर्व गुण असताना आणि तिने नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व निकष पूर्ण केले असतानाही तिला नोकरी नाकारण्यात आली. ही महिला आमच्या जाडीबाबतच्या निकषांत बसत नसल्यामुळेच आम्ही तिला नाकारत असल्याचं कंपनीनं कळवलं आणि रिक्रूटमेंट कंपनीतील (Angry over reasons) अधिकाऱ्यांच्या रागाचा पारा चढला.

पत्र वाचून बसला धक्का

लंडनमधील रिक्रुटमेंट डायरेक्टर फाये एंगेलेटा यांनी एका महिलेला नोकरीसाठी एका एम्प्लॉयरकडं पाठवलं होतं. त्या पदासाठी महिलेची परीक्षा आणि मुलाखत घेण्यात आली. पात्रतेचे सर्व निकष या महिलेनं पूर्णही केले. नोकरीसाठीचं ऑफर लेटर कधी येतं, याची ती वाट पाहत होती. मात्र प्रत्यक्षात ऑफर लेटर येण्याऐवजी रिजेक्शनचं लेटर आलं. त्यातील कारण वाचून रिक्रूटमेंट कंपनीलाच धक्का बसला.

लठ्ठपणामुळे नकार

महिलेने पात्रतेसाठीचे सगळे निकष पूर्ण केले असले तरी ती प्रमाणापेक्षा अधिक लठ्ठ असल्यामुळे तिला ही नोकरी देण्यास आम्ही तयार नाही, अशा आशयाचं पत्र कंपनीनं तिला पाठवलं. आपल्या कंपनीत इतर सर्व पात्रतांसोबत स्लिम असणं हादेखील एक निकष असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. विशिष्ट प्रकारची कमनियता असल्याशिवाय आपण कुणालाही नोकरीवर ठेवत नसून सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा समान नियम लावण्यात आल्याचा दावा कंपनीनं केला आहे. फिटनेस आणि लुक्स याबाबत कंपनीचे काही ठराविक निकष आहेत. मुख्य पात्रतेसोबत हे निकषदेखील पूर्ण करणाऱ्या व्यक्तीलाच आम्ही नोकरीवर ठेवतो, असं या कंपनीनं कळवलं आहे.

हे वाचा- CBSE Exam 2021: कोणतीही परीक्षा देताना टाळा 'या' चुका; अशी करा सुधारणा

रिक्रुटर कंपनीला धक्का

आतापर्यंत आपण एखाद्याला नोकरी नाकारण्याची अनेक कारणं सांगितली आहेत. मात्र हे कारण पहिल्यांदाच ऐकत असल्याचं रिक्रुटर कंपनीनं म्हटलं आहे. यापूर्वी श्वासाला येणाऱ्या दुर्गंधीसाठीदेखील काहीजणांना नोकऱ्या नाकारण्यात आल्या होत्या.

First published:

Tags: Britain, Fitness, Job