मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

महिलेला आहे अंत्यसंस्कारांना जाण्याची हौस, 150 जणांना दिला अखेरचा निरोप

महिलेला आहे अंत्यसंस्कारांना जाण्याची हौस, 150 जणांना दिला अखेरचा निरोप

बाहेरच्या जगापेक्षाही एका महिलेला स्मशानात राहायला अधिक आवडतं. आपलं खरं जग आणि प्रेमाची उब याच ठिकाणी आहे, असं तिचं मत आहे.

बाहेरच्या जगापेक्षाही एका महिलेला स्मशानात राहायला अधिक आवडतं. आपलं खरं जग आणि प्रेमाची उब याच ठिकाणी आहे, असं तिचं मत आहे.

बाहेरच्या जगापेक्षाही एका महिलेला स्मशानात राहायला अधिक आवडतं. आपलं खरं जग आणि प्रेमाची उब याच ठिकाणी आहे, असं तिचं मत आहे.

    लंडन, 5 डिसेंबर: एका महिलेला अपरिचित लोकांच्या अंत्यसंस्कारांना (Habit to attend funerals) जाण्याची हौस आहे. आतापर्यंत ती सुमारे 150 पेक्षा जास्त (Present to more than 150 funerals) लोकांच्या अंत्यसंस्काराला हजर राहिली आहे. अंत्यसंस्काराला जाणं हे बहुतांश लोकांना नकोसं वाटतं. तिथं असणारं दुःखाचं वातावरण, आपल्याशी परिचित (Tragic atmosphere in funerals) व्यक्तीचा पडलेला मृतदेह, त्याच्यावर होणारे अंत्यसंस्कार, रडणारे लोक हे वातावरण अनेकांच्या अंगावर येतं. त्यामुळे आपल्या आय़ुष्यात अंत्यसंस्काराला हजर राहण्याचे कमीत कमी प्रसंग यावेत, असंच प्रत्येकाला वाटत असतं. मात्र लंडनमध्ये राहणाऱ्या इजलिंग्टनची कहाणी सामान्यांपेक्षा फारच वेगळी आहे. अंत्यसंस्कारांना जाण्याची सवय गेल्या काही वर्षांपासून इजलिंग्टनला अंत्यसंस्काराला जाण्याची सवयच जडली आहे. अनेकदा तर ती अपरिचित लोकांच्या अंत्यसंस्कारालाही हजेरी लावते आणि तासनतास स्मशानात बसून जाते. स्मशानातील फोटोग्राफीदेखील ती करते. ‘द सन’ या बेवसाईटनं दिलेल्या बातमीनुसार महिन्यातून किमान 4 अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम ही महिला करते आणि आपला जीव बाहेरच्या जगापेक्षा स्मशानातच अधिक रमत असल्याचं सांगते. आईवडिलांच्या निधनाचा धक्का इजलिंग्टन अवघी 14 वर्षांची असताना तिच्या वडिलांचं अकाली निधन झालं. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारांना ती हजर होती. त्यानंतर सहा वर्षांनी तिची आई वारली. त्यावेळी आईच्या अंत्यसंस्कारांचं पूर्ण नियोजन तिने एकटीने केलं आणि आपल्या आईला अखेरचा निरोप दिला. तेव्हापासून तिला तिचे मित्र आणि नातेवाईक अंत्यसंस्काराचं नियोजन करण्यासाठी बोलावतात आणि कधीही नकार न देता ती या कार्यक्रमांना हजर राहते. हे वाचा- मैत्रिणीचं ATM कार्ड चोरून केली शॉपिंग; मग बेस्टफ्रेंडवरच चाकूने केला हल्ला अन् स्मशानात भेटते उब आपल्याला सोडून आपले आईवडील निघून गेले तरी या स्मशानभूमीतच ते आपल्याला भेटतात, असं इजलिंग्टनला वाटतं. आपल्याला प्रेमाची उब आणि प्रेमळ आठवणींचा आधार केवळ स्मशानातच मिळतो, असं तिचं मत आहे. मरणानंतरही एक वेगळं जग असतं आणि या जगातील माणसं त्या जगात जातात, यावर तिचा ठाम विश्वास आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Funeral

    पुढील बातम्या