Home /News /crime /

आधी मैत्रिणीचं ATM कार्ड चोरून केली शॉपिंग; मग बेस्टफ्रेंडवरच चाकूने 18 वेळा केला हल्ला अन्...

आधी मैत्रिणीचं ATM कार्ड चोरून केली शॉपिंग; मग बेस्टफ्रेंडवरच चाकूने 18 वेळा केला हल्ला अन्...

एका महिलेनं आपल्या बेस्टफ्रेंडचं एटीएम कार्ड (ATM Card) चोरलं आणि या पैशातून शॉपिंग केली. यानंतर मैत्रिणीला जेव्हा या चोरीबाबत समजलं तेव्हा आरोपी महिलेनं तिच्यावर चाकूने 18 वेळा हल्ला केला

    नवी दिल्ली 05 डिसेंबर : मैत्री (Friendship) हे अतिशय प्रेमळ नातं असल्याचं म्हटलं जातं. मात्र इंग्लंडच्या वेस्ट डर्बीमधून मैत्रीच्या सुंदर नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं आपल्या बेस्टफ्रेंडचं एटीएम कार्ड (ATM Card) चोरलं आणि या पैशातून शॉपिंग केली. यानंतर मैत्रिणीला जेव्हा या चोरीबाबत समजलं तेव्हा आरोपी महिलेनं तिच्यावर चाकूने 18 वेळा हल्ला करत तिला मारण्याचा प्रयत्न केला (Woman Stabbed her Friend 18 Times with Knife). मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचं नाव लॉरेन वॉल्श (Lauren Walsh) असं आहे. आपली मैत्रिण केल्सी गिएलिंक हिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात ती दोषी आढळली आहे. लॉरेनने केल्सीवर चाकूने अठरा वेळा हल्ला केला. यासोबतच तिच्यावर आपल्या आईचा बॉयफ्रेंड वेस्ली पेम्बर्टन याच्यावर चाकू हल्ला केल्याचाही आरोप आहे. द मिररच्या वृत्तानुसार, लॉरेननं दोन्ही पीडितांना चाकूने मारण्याच्या उद्देशाने जखमी केल्याचा गुन्हा मान्य केला आहे. लिवरपूल इकोच्या वृत्तानुसार, तिने मैत्रिणीचं बँक कार्ड चोरी केल्याचंही मान्य केलं आहे. याच पैशांचा वापर करत तिने 14 हजार रुपयांचा शॉपिंग केली होती. लिवरपूल क्राउन कोर्टमध्ये तब्बल 11 तासाच्या सुनावणीनंतर लॉरेनला मैत्रीण गिएलिंक हिच्या हत्येच्या प्रयत्नात दोषी घोषित केलं गेलं. लॉरेन कोर्टाने निर्णय सुनावताना तिथे हजर नव्हती. जज डेविड ऑब्रे, क्यूसी यांनी ज्यूरींना पेम्बर्टनच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वेगळा निर्णय सुनावण्यास सांगितलं आहे. लॉरेनने ज्यूरींना सांगितलं की ती आपण चोरी केल्याचं मान्य करण्यासाठी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. मात्र, तिची हिंमत होत नव्हती. जेव्हा तिने हिंमत करून ही बाब सांगितली तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला शिव्या देण्यास सुरुवात केली आणि भरपूर सुनावलं. यानंतर भडकलेल्या लॉरेनने गिएलिंकवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या