जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Shocking! सामान उचलायला वाकली आणि झाला मृत्यू; महिलेची एक छोटीशी चूक जीवावर बेतली

Shocking! सामान उचलायला वाकली आणि झाला मृत्यू; महिलेची एक छोटीशी चूक जीवावर बेतली

एअरपोर्टवर महिलेसोबत भयंकर दुर्घटना. (प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

एअरपोर्टवर महिलेसोबत भयंकर दुर्घटना. (प्रतीकात्मक फोटो सौजन्य - Canva)

एअरपोर्टवर काम करणाऱ्या महिलेकडून सामान उचलताना अशी चूक झाली ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 02 सप्टेंबर : मृत्यू कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. हसता, बोलता, चालता कधीही मृत्यू ओढावू शकतो. काही वेळा आपली छोटीशी चूकही आपल्या जीवावर बेतू शकते. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला सामान ठेवण्यासाठी म्हणून खाली वाकली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या एका छोट्याशा चुकीने तिचा जीव घेतला आहे. अमेरिकेतील एअरपोर्टवरील ही घटना आहे. जेर्मनी थॉम्पसन असं मृत महिलेचं नाव आहे. 26 वर्षांची जेर्मनी न्यूज ओर्लांस एअरपोर्यवर काम करायची. लगेज बेल्टवर ती काम करत होती. पण त्या दिवशी तिच्यासोबत असं काही घडलं ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. ज्या लगेज बेल्टवर ती काम करत होती, ते लगेच बेल्टच तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. या लगेज बेल्टवरच तिचा मृत्यू झाला. हे वाचा -  धक्कादायक! नाचता नाचता अचानक जमिनीवर कोसळला तो उठलाच नाही; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू त्या दिवशी जेर्मनीने आपले केस मोकळे सोडले होते. ती लगेज बेल्टवरील कामान उचलण्यासाठी म्हणून खाली वाकली आणि तिचे केस त्या बेल्टमध्ये लगेच बेल्टमध्ये अडकले. बेल्ट चालू होता ज्यामुळे ती केसांसह खेचली गेली. बेल्ट थांबण्याआधीच तिच्या केसांचा मोठा झुपका त्वचसकट उपटून आला. तिला तात्काळ रुग्णालयात देण्यात आलं. पण तिला वाचवता आलं नाही तिचा मृत्यू झाला. डेली मेल च्या रिपोर्टनुसार ही घटना 30 ऑगस्टची आहे. या प्रकरणाबाबत सांगताना एअरपोर्टच्या प्रवक्त्यांनी जेर्मनीचा मृत्यू बेल्टमध्ये केस अडकल्याने झाला. यानंतर ज्या फ्रंटियर एअरलाइन्ससाठी ती काम करत होती, त्या एअरलाइन्सच्या सर्व फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या. लांब केसांनी घेतला जीव आधी बेलारूसमध्येही एका महिलेचा असाच केसांमुळे मृत्यू झाला होता. उमुदा नजारोवा असं तिचं नाव. बोरिसोव शहरातील एका फॅक्ट्रीमध्ये ती नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेली. मुलाखतीनंतर एक कर्मचारी तिला फॅक्टरी दाखवण्यासाठी घेऊन गेला. फॅक्ट्रीमधील एका मशीनच्या बाजूला ती उभी राहिली होती. त्यावेळी तिचे लांब केस मशीनमध्ये अडकले. मशीनमुळे केस ओढले गेल्याने तिच्या गळ्याच्या चारही बाजूने तिचेच केस फाशी लागल्याप्रमाणे गुंडाळले गेले. हे वाचा -  सुसाट बाईकवर हातापायाची घडी घालून निवांत बसला; 25 सेकंदातच…; धडकी भरवणारा VIDEO उमिदाचा गळा वाईट पद्धतीने दाबला गेला आणि तिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. फॅक्ट्रीच्या कर्मचाऱ्यांनी लगेचच उमिदाला रुग्णालयात दाखल केलं. ती बेशुद्ध झाली होती आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतरही 20 दिवस ती शुद्धीवर आली नाही. 20 दिवस जीवनासाठी संघर्ष केल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात