एकमेकांचे लाईफ पार्टनर असताना आणि (Woman and her partner split their house to live separate) एकाच छताखाली राहत असताना घराच्या मधोमध एका जोडप्यानं भिंत उभारली आहे. टिकटॉकवर एका महिलेनं आपला याबाबतचा अनुभव शेअर केला (Video shared on Tiktok) असून मानसिक समस्या सोडवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय असल्याचं तिचं म्हणणं आहे. प्रत्येकाचा आपली मानसिक समस्या सोडवण्याचा आणि स्वतःची स्पेस (To find the own space) शोधण्याचा प्रयत्न असतो. काहीजण त्यासाठी भांडतात, काहीजण समजूतदारपणा दाखवतात तर काही असे भन्नाट उपाय शोधून काढतात. या महिलेनं शोधून काढलेल्या उपायाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा होत आहे.
काय आहे संकल्पना?
टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करणाऱ्या या महिलेनं दिलेल्या माहितीनुसार ती एका ब्लेंडेट फॅमिलीत राहते. याचाच अर्थ ती आणि तिचा पार्टनर या दोघांनाही त्यांच्या आधीच्या पार्टनरपासून झालेली मुलं आहे. ती मुलं आणि नवे पार्टनर या कुटुंबाला ब्लेंडेट फॅमिली म्हटलं जातं. या मुलांचं काही एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे त्यांना वेगळं राहता यावं आणि त्यांची प्रायव्हसी भंग झालीय असं वाटू नये, यासाठी त्यांनी हा उपाय केला आहे.
एकच घर, पण दोन कुटुंब
शैली नावाच्या महिलेनं हा व्हिडिओ शेअर केला असून इतर कुणाला असा अनुभव आलाय का, असा प्रश्नही विचारला आहे. शैली ही तिच्या दोन मुलांसोबत घराच्या एका भागात राहते, तर तिचा पार्टनर त्याच्या तीन मुलांसोबत वेगळ्या भागात राहतो. मुलांना अवघडलेपण येऊ नये आणि त्यांना त्यांची स्पेस मिळावी, हा यामागचा उद्देश असल्याचं शैली सांगते.
हे वाचा- नोकरी सोडून जोडप्यानं विकत घेतली नाव, सुरु आहे जगाची भ्रमंती
नेटिझन्सकडून कौतुक
अनेकांनी या संकल्पनेचं कौतुक करत शैलीला प्रोत्साहन दिलं आहे. मुलांवर कुठलाही ताण येऊ न देता राबवलेली ही संकल्पना भन्नाट असल्याची प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर आपल्याला आपल्या बायकोपासून वेगळं राहायची इच्छा आहे, असं म्हणत एकाने हशा पिकवण्याचाही प्रयत्न केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FAMILY, Tik tok, Wife and husband