मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

काहीही झालं तरी झुकणार नाही! छोट्या तैवानचा चीनला निर्वाणीचा इशारा

काहीही झालं तरी झुकणार नाही! छोट्या तैवानचा चीनला निर्वाणीचा इशारा

काहीही झालं तरी तैवान चीनसमोर झुकणार नाही, असा (Will not tolerate pressure from China warns Tailwan president) इशारा तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी दिला.

काहीही झालं तरी तैवान चीनसमोर झुकणार नाही, असा (Will not tolerate pressure from China warns Tailwan president) इशारा तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी दिला.

काहीही झालं तरी तैवान चीनसमोर झुकणार नाही, असा (Will not tolerate pressure from China warns Tailwan president) इशारा तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी दिला.

  • Published by:  desk news

तैपेई, 10 ऑक्टोबर : काहीही झालं तरी तैवान चीनसमोर झुकणार नाही, असा (Will not tolerate pressure from China warns Tailwan president) इशारा तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी दिला. तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या देशाला संबोधित करत होत्या. दोन्ही देशांतील संबंध जसे पूर्वापार सलोख्याचे आहेत, (Status quo should be maintained in relation of both the nations) तसेच राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र एखादा देश केवळ बलाढ्य आहे, या कारणासाठी आम्ही दबाव सहन करू शकत नाही, असा इशारा चीनला दिला आहे.

काय म्हणाल्या राष्ट्रपती?

दोन देशांमध्ये सलोखा राहावा, यासाठी आपणएकतर्फी प्रयत्न करायलाही तयार आहोत. मात्र ताकदीच्या बळावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. चीनकडून तैवानवर आपला भूभाग असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र तैवान या स्वायत्त भूभाग असून कुणाचंही आक्रमण खपवून घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

गेल्या आठवड्यात चीनकडून राष्ट्रीय दिवसांच्या प्रात्यक्षिकांचं निमित्त करून आपली विमान तैवानच्या सुरक्षा हद्दीत घुसवण्यात आली. तैवानच्या सुरक्षा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार चीननं अठरा जे-16 विमानं, चार सुखोई विमानं आणि दोन अण्वस्त्रं टाकण्याची क्षमता असलेली एच-6 बॉम्बर विमानं तैवानच्या हद्दीत घुसवली. या ताफ्यात एक अँटी सबमरीन एअक्राफ्टदेखील होती. चीनच्या या घुसखोरीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा निर्णय तैवानने घेतला.

हे वाचा - VIDEO : हुशार नवऱ्याची कमाल; पत्नीसाठी उभारलं घर की आता पर्यटनाचं झालंय केंद्र!

तैवानने तातडीने आपली फायटर प्लेन्स उडवली आणि चीनला उत्तर दिलं. आपल्या हवाई हद्दीतील घुसखोरी सहन केली जाणार नसल्याचा इशाराच तैवानने या कृतीतून चीनला दिला. मात्र त्यानंतरही चीनची खोड मोडली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा चीनकडून फायटर्स प्लेनचा ताफा तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून आला. शनिवारी पहाटेच्या सुमाराला तैवानच्या हद्दीत 13 फायटर जेट घुसवण्यात आले. यामध्ये दहा जे-16, दोन एच-6 बॉम्बर आणि एक अर्ली वॉर्निंग एअरक्राफ्ट यांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा तैवाननं आपली विमानं उडवून चिनी विमानांना हद्दीबाहेर हुसकावून लावलं. त्याचप्रमाणं चिनी विमानांनी पुन्हा घुसखोरी केली, तर निशाणा साधण्यासाठी आपली मिसाईलदेखील सज्ज केली.

या प्रकारानंतर आता दोन्ही देशांतील तणाव वाढला असून एकमेकांविरोधात इशारे दिले जात आहेत.

First published:

Tags: China, Taiwan