साराजेवो, 10 ऑक्टोबर : स्वत:च्या घराबद्दल (Sweet Home) महिलांच्या खूप अपेक्षा असतात. घराची रचना कशी असावी, घराच्या खिडकीतून कसा व्ह्यू दिसायला हवा..अशा अनेक गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या असतात. आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क फिरणारं घर तयार केलं आहे. त्याच्या पत्नीला घराच्या खिडकीतून वेगवेगळे व्ह्यू पाहायचे होते. यासाठी पतीने फिरणारं घरच (husband built a moveable house) तयार केलं. ज्यामुळे पत्नी आपल्या खिडकीतून कधी जंगल, कधी डोंगर तर कधी नदी असे विविध प्रकारचे व्ह्यू पाहू शकते.
रॉयटर्सशी बोलताना 72 वर्षीय वोजिन कुसिक याने सांगितलं की, घरात वारंवार होणारी डागडुजी आणि पत्नीच्या तक्रारींमुळे वैतागलो होतो. म्हणून मी तिला म्हटलं की, तुझ्यासाठी आता फिरणारं घरचं उभं करतो. ज्यात तू तुझ्या मर्जीने घर फिरवू शकशील आणि हवा तो व्ह्यू पाहू शकशील. आता हे घर पर्यटन आणि स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलं आहे. (Husband builds movable house for wifes wish Watch the video)
हे ही वाचा-विचित्र कारणामुळे मॉडेलने 3 वर्षांपर्यंत केला नाही सेक्स; आता अशी झाली अवस्था
आपल्या मनाने स्पीड करा सेट
हे घर बोस्नियाच्या उत्तरेकडील Srbac शहरातील एका मैदानात उभारण्यात आलं आहे. हे घर कुसिकने डिजाइन केलं आहे. हे घर 7 मीटरच्या परीघात चारही दिशेने फिरतं. फिरता फिरता घरातून मक्याचे शेत, जंगल आणि नदी यांसारखी दृश्य इच्छेनुसार पाहता येऊ शकतं. सर्वात धीम्या गतीवर घर 24 तासात एक फेरी घेऊ शकतं. तर अत्यंत जलद स्पीडने 22 सेकंदात एक फेरी पूर्ण होते.
घर तयार व्हायला 6 वर्षे लागली..
कुसिकने सांगितलं की, हा कोणताही चमत्कार नाही. यासाठी केव इच्छा आणि ज्ञानाची आवश्यकता असते. आणि माझ्याकडे वेळ आणि ज्ञानाची काही कमतरता नव्हती. कुसिकने दावा केला आहे की, त्याने स्वत: घर उभारलं आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 6 वर्षे लागली. त्यांनी सांगितलं की, हे घर सर्वसामान्य घरांच्या तुलनेत अधिक भूकंप प्रतिबंधित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Video viral