• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Shocking! बायकोच्या हातचं प्रोटिन शेक पिऊन पिऊन मृत्यूच्या दारात पोहोचला नवरा; नेमकं काय प्रकरण आहे वाचा

Shocking! बायकोच्या हातचं प्रोटिन शेक पिऊन पिऊन मृत्यूच्या दारात पोहोचला नवरा; नेमकं काय प्रकरण आहे वाचा

बायको जे प्रोटिन शेक देत होती ते त्याला हेल्दी आणि फिट ठेवण्याऐवजी त्याचा जीव घेत आहे, याची कल्पनाही नवऱ्याला नव्हती.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 21 सप्टेंबर : नवरा-बायकोत (Husband wife) म्हटलं की त्यांच्यात भांडणं ही होतच असतात. पण काही वेळा हे भांडणं इतकं टोकाला जातं की दोघंही एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अमेरिकेतील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या बायकोच्या मनात नवऱ्याबद्दल इतका तिरस्कार निर्माण झाला की तिने नवऱ्याला संपवण्याची प्लॅनिंग केली. तिने प्रोटिन शेक देऊन देऊन नवऱ्याला जीवे मारण्याचा प्लॅन केला (Poison In Protein Powder). दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या 56 वर्षांचा जेडी मॅककेबेला त्याची बायको एरिन यांच्या लग्नाला 17 वर्षे झाली. त्यांना दोन मुलंही होती. त्यांचा संसार पाहून हे लोक किती आनंदात आहे, असंच पाहणाऱ्याला वाटायचं. एरिन जेडीची खूप काळजी घ्यायची. जेडी जीममधून आला की ती स्वतः त्याला प्रोटिन शेक बनवून द्यायची (Wife gave protien powder with poision). पण प्रोटिन शेक पिऊन जेडीला काही महिन्यांत अशक्तपणा जाणवू लागला, त्याच्या पोटात, सांध्यांमध्ये वेदना होऊ लागल्या, आतड्यांना सूज आली. त्याचं वजन वाढण्याऐवजी झपाट्याने कमी होऊ लागलं. त्याचं वजन इतकं कमी झालं की लोक त्याला कॅन्सर रुग्ण समजायचे. हे वाचा - बापरे! आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक चाखलं तरी जाऊ शकतो जीव; विचित्र आजारासह जगतेय तरुणी याचदरम्यान एरिनचा व्यवहारही बदलला. तिने जेडीवर आपली फसवून केल्याचा आरोप केला. ड्रग्ज आणि दारूमुळे तो मानसिक रुग्ण झाल्याचा आरोप केला. तिने जेडीकडून घटस्फोटही घेतला. घटस्फोटानंतर जेडी डॉक्टरांकडे गेला. त्याने आपलं वजन कमी का होत आहे, म्हणून वैद्यकीय तपासणी करून घेतली तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. जेडीची बायको त्याला जे प्रोटिन शेक देत होती ते त्याला हेल्दी आणि फिट ठेवण्याऐवजी त्याचा जीव घेत आहे, याची कल्पनाही त्याला नव्हती. कारण त्याची त्याला जे प्रोटिन शेक देत होती, ते फक्त प्रोटिन शेक नव्हतं तर त्यात विष विष होतं. डॉक्टरांच्या मते, जेडीच्या शरीरात विष असल्याचं वेळेत समजलं नाहीतर त्याचा मृत्यू अटळ होता. आर्सेनिकचा काही अंशच जीव जाण्यासाठी पुरेसा आहे. पण प्रोटिन पावडरमध्ये मिसळून दिल्याने कमी मात्रेसह हे शरीरावर हळूहळू दुष्परिणाम करतं. सुदैवाने जेडीला याबाबत वेळेत माहिती झाली आणि त्याचा जीव वाचला. हे वाचा - जोर का झटका! जुळ्या मुलांचे वेगवेगळे बाप; डीएनए रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण डेली स्टारच्या रिपोर्टनुसार एरिन जेडीला प्रोटिन पावडरमधून विष देत होती. किती तरी दिवसांपासून एरिन प्रोटिन पावडरमध्ये आर्सेनिक विष मिसळून देत होती आणि जेडीला याची काहीच माहिती नव्हती. जेव्हा वैद्यकीय रिपोर्ट मिळाला तेव्हा जेडीने एरिनवर आपल्याला विष दिल्याचा आरोप केला.  या प्रकरणात आता पोलीस तपास सुरू आहे.
  Published by:Priya Lad
  First published: