Home /News /videsh /

..अन् त्यांनी इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली; पंतप्रधानपद जाण्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानात नेमकं काय घडलं?

..अन् त्यांनी इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली; पंतप्रधानपद जाण्याच्या आदल्या रात्री पाकिस्तानात नेमकं काय घडलं?

खान यांची भेट घेऊन आयएसआय प्रमुखांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं. मात्र, खान यांनी नकार देत शिवीगाळ सुरू केली. हा वाद वाढला आणि रागाच्या भरात आयएसआय प्रमुख नदीम अंजुम यांनी इम्रान खान यांच्या डाव्या गालावर थोबाडीत मारली, असं म्हटलं जात आहे.

पुढे वाचा ...
कराची 16 एप्रिल : भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. 2018मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या (Military) मदतीनं सत्तेवर आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (PM Imran Khan) यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव (No-confidence Motion) मांडला होता. त्यामुळे 9 आणि 10 एप्रिलच्या मध्यरात्री पाकिस्तानात इम्रान खान यांचं सरकार पडलं. या सर्व घडामोडी घडत असताना तिथे प्रचंड पॉलिटिकल ड्रामा (Political Drama) झाला. यातील काही गोष्टी उघडकीस आल्या तर काही दडपून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. 9 एप्रिलच्या रात्री बनिगाला या पाकिस्तानच्या सरकारी निवासस्थानातील लॉनमध्ये हेलिकॉप्टर (Helicopter) उतरल्याची बातमी आली होती. या हेलिकॉप्टरमध्ये दोन महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. या दोन्ही व्यक्तींनी एका बंद खोलीत इम्रान यांची भेट घेतली आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यामुळे इम्रान खान संतापले आणि त्यांनी त्या व्यक्तींना शिवीगाळ केल्याची माहिती उघडकीस आली आहे. असा दावा केला जात आहे की, इम्रान खान यांच्या वर्तणुकीमुळे संतापलेल्या या दोन व्यक्तींपैकी एकानं पंतप्रधानांना जोरदार थोबाडीत (Slap) मारली. त्यानंतर इम्रान खान यांच्या हातातून सर्व गोष्टी निसटल्या. अविश्वास ठरावावर मतदान झालं आणि सरकार पडलं. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भाषणानंतर हवेत Handshake करताना दिसले जो बायडेन, क्षणार्धात Video Viral कधीकाळी अखंड भारताचा भाग असलेला पाकिस्तान सध्या भारताचा एक प्रकारे प्रतिस्पर्धीच आहे. त्या ठिकाणी घडणाऱ्या राजकीय घटनांचा भारतावर (India) परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे सध्या घडत असलेल्या राजकीय घटनाक्रमाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इम्रान खान यांच्या डाव्या डोळ्याखाली जखम दिसल्यानं 'थप्पड' (म्हणजे थोबाडीत मारण्याच्या) प्रकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. ती जखम कसली आहे? पंतप्रधान दोन दिवस सगळीकडे चष्मा घालून का फिरले? असे प्रश्न उपस्थित झाले होते. ही चर्चा इतकी रंगली होती की, 14 एप्रिल रोजी लष्कराच्या प्रवक्त्याला नॅशनल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. अनेक एकरांवर पसरलेल्या पंतप्रधान इम्रान यांच्या बनिगाला या आलिशान घरात 9 आणि 10 एप्रिलच्या रात्री काहीतरी विचित्र घडल्याची माहिती पाकिस्तानातील सोशल मीडियावर (Pakistan Social Media) चर्चिली जात होती. त्यानंतर बीबीसी उर्दूनं (BBC Urdu) काही संकेतांच्या आधारे याबाबत वृत्त देण्याचा प्रयत्न केला होता. तीन प्रमुख पाकिस्तानी पत्रकार (Journalist) आरजू काझमी (Arzoo Kazmi), सलीम साफी (Saleem Safi) आणि असद अली तूर (Asad Ali Toor) यांनी ही गोष्ट बर्‍यापैकी स्पष्ट केली. पत्रकार असद अली तूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्याकडे बहुमत नाही आणि त्यांचं सरकार पडणार हे निश्चित होतं. तरीही खान ना मतदानासाठी तयार होते ना राजीनाम्यासाठी. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशालाही स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे खान यांना पंतप्रधान बनवणाऱ्या लष्कराची प्रतिमा डागाळत चालली होती. 9 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लष्करानं इम्रान खान यांना राजीनामा देण्याचा निरोप पाठवला होता. तूर पुढे म्हणाले, ‘इम्रान खान यांनी लष्कराच्या आदेशाचे पालन करण्याऐवजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (Qamar Javed Bajwa) यांच्याकडे एक निरोप घेऊन पाठवलं. 'पंतप्रधान मतदानासाठी किंवा राजीनामा देण्यास तयार नाहीत. त्यांना राष्ट्रीय संसद बरखास्त करून निवडणुका घ्यायच्या आहेत,' असा तो निरोप होता. लष्करानं हा निरोप फेटाळून लावत खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचे निर्देश दिले. यानंतर परिस्थिती आणखी बिघडली.’ Russia-Ukraine War: रशियाच्या क्रूरतेचा कळस; किवच्या रस्त्यावर मृतदेहांचा खच, मारियुपोलमध्ये 21 हून अधिक मृत्यू 9 एप्रिलच्या रात्री इम्रान खान हे कोणाशी तरी फोनवर बोलण्यासाठी घराजवळील लॉनवर गेले होते. त्याचवेळी संसदेचे सभापती आणि उपसभापती संसदेतील मतदान पुढे ढकलण्यासाठी सर्व घटनाबाह्य युक्त्या वापरत होते. आर्मी इंटेलिजन्सनं (Army Intelligence) इम्रान खान यांचा कॉल इंटरसेप्ट केला. त्यानंतर रात्री 11च्या सुमारास रावळपिंडी (Rawalpindi) येथील लष्कराच्या मुख्यालयातून (Army Headquarters) एका हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. त्यात आयएसआय (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम (Lieutenant General Nadeem Anjum) आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा होते. हे हेलिकॉप्टर काही मिनिटांनी खान यांच्या घराच्या लॉनमध्ये उतरलं. दोघेही थेट खान यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी खान जवळच्या तीन मित्रांशी बोलत होते. खान यांची भेट घेऊन आयएसआय प्रमुखांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं. मात्र, खान यांनी नकार देत शिवीगाळ सुरू केली. हा वाद वाढला आणि रागाच्या भरात आयएसआय प्रमुख नदीम अंजुम यांनी इम्रान खान यांच्या डाव्या गालावर थोबाडीत मारली, असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान यांना जनरल बाजवा यांना हटवून आयएसआयचे माजी प्रमुख आणि त्यांचे खास मित्र जनरल फैज हमीद यांना लष्करप्रमुख बनवायचं होतं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हमीद यांना आयएसआयमधून काढून टाकण्याच्या मुद्द्यावरूनच बाजवा आणि खान यांचे संबंध बिघडले होते. हमीद सध्या पेशावरचे कोर कमांडर आहेत. याबाबत पत्रकार सलीम साफी म्हणाले, ‘ इम्रान खान यांनी संरक्षण सचिवांना फोन केला आणि बाजवा यांची हकालपट्टी व फैज हमीद यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याच्या नोटिफिकेशन (Notification) तयार केल्या होत्या. या नोटिफिकेशनवर फक्त क्रमांक लिहून त्या रिलीज करणं बाकी होतं. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही. आयएसआय प्रमुख इम्रान खान यांना स्पष्टपणे म्हणाले होते की, इम्रान यांच्या गुप्त हालचालींबाबत त्यांना सर्व काही माहिती आहे. आत्ताच मतदान न केल्यास वाईट परिणाम होतील. लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम आणि बाजवा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर अत्ता बंडयाल आणि इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे कठोर स्वभावाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनाल्ला यांना या प्रकरणाची माहिती दिली. दोघांनी मध्यरात्री आपापलं कोर्ट उघडलं. जनरल बाजवा यांच्या बडतर्फीला स्थगिती मिळावी यासाठी एका वकिलाने मिनाल्ला यांच्यासमोर याचिका दाखल केली. मात्र, तोपर्यंत सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा दिला. त्यानंतर नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे अयाज सादिक स्पीकरच्या खुर्चीवर बसले. सादिक यांनी तत्काळ मतदान घेतलं आणि इम्रान खान यांचा समावेश पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या यादीत झाला.’ Ukraine Crisis : रशियानं 'मोस्कवा'च्या विनाशाचा घेतला बदला, नेपच्यून क्षेपणास्त्र निर्मितीचा प्लँटच उडवला पाकिस्तानी पत्रकार आमना आणि जफर नक्वी म्हणतात की, 10 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता लष्करानं इस्लामाबादमधील चार आलिशान घरांवर छापे टाकले. यापैकी एक घर इम्रान खान यांचा पक्षातील महत्त्वाची व्यक्ती अर्सलान खालिद यांचं आहे. खालिद हे पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या (PTI) सोशल मीडिया विंगचे प्रमुख आहेत. त्यांच्या घरातून सर्व मोबाईल, लॅपटॉप आणि डिजिटल डायरी जप्त करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्कराची बदनामी करण्याचा डाव खान यांनी आखला होता. याप्रकरणी आतापर्यंत लष्करानं 12 जणांना ताब्यात घेतलं आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख आणि इम्रान खान यांचे मुख्य सचिव आझम खान हे देश सोडून गेले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. समोर आलेली माहिती पाहिली असता, इम्रान खान यांनी स्वत:च आपल्या अडचणींमध्ये वाढ करून घेतल्याचं, तज्ज्ञांचं मत आहे. आता पाकिस्तानमध्ये नवीन सरकार सत्तेत आलं आहे. त्या सरकारच्या ध्येय-धोरणांचा भारतावर काय परिणाम होतील, हे पाहणं गरजेच आहे. कारण, भारत आणि पाकिस्तान दरम्यान एकूण तीन हजार 323 किलोमीटरची इंटरनॅशनल बॉर्डर आहे. दोन्ही देशांदरम्यान लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलदेखील (LOC) आहे. भारतातील जम्मू काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एक हजार 222 किलोमीटर सामाईक बॉर्डर आहे. तर पंजाब, राजस्थान आणि गुजरातची अनुक्रमे 425, एक हजार 170 आणि 506 किलोमीटर बॉर्डर पाकिस्तानला लागून आहे. यापैकी फक्त जम्मू काश्मीरमधील बॉर्डरचा काही भाग एलओसी मानली जाते. एलओसीची लांबी 776 किमी असल्याचं म्हटलं जातं. मात्र, हा आकडा अधिकृत नाही. 1947मध्ये दोन्ही देशांची फाळणी झाल्यानंतर वाद झाला होता. पाकिस्तानी सैन्यानं जम्मू काश्मीरमधील काही भाग ताब्यात घेतला होता. एलओसीमुळे पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगीट बाल्टिस्तान हे भाग वेगळे होतात. 1972मध्ये झालेल्या शिमला करारामुळे एलओसी अस्तित्त्वात आली होती. अखनूर सेक्टरमधील मनावर तवी परिसरातील भूरेचक गावापासून सुरू होते आणि कारगिल सेक्टरमधील सियाचीन हिमखंडाच्या सीमेजवळ संपते. ज्या ठिकाणी एलओसीचा शेवट आहे त्याला 'एनजे - 9842' असं म्हणतात. ईस्टर्न लॅटिट्युटवर 98 अंश आणि नॉदर्न लॅटिट्युटवर 42 अंश, असा याचा अर्थ होतो.
First published:

Tags: Pak pm Imran Khan, Pakistan

पुढील बातम्या