हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवली जात आहे. काही लोक असेही म्हणतात की बायडेन डिमेंशिया नावाच्या आजाराशी लढा देत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही त्यांच्या वयावर निशाणा साधत आहेत. बायडेन यांचे वाढते वय त्यांना सोडून जात आहे, त्यामुळे आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचाही विचार करायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे. आधीही केलीय अशीच 'चूक' अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीही अशी चूक केली आहे. काही काळापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते सरळ रस्ता सोडून घरात घुसले होते. मग असे बोलले जात होते की, चालताना बायडेन अचानक रस्ता विसरले असावेत.After Biden finished his speech, he turned around and tried to shake hands with thin air and then wandered around looking confused pic.twitter.com/ZN00TLdUUo
— Washington Free Beacon (@FreeBeacon) April 14, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, US President