Home /News /videsh /

Chemical Weapons | रासायनिक शस्त्रे किती धोकादायक? रशिया युक्रेन युद्धात त्यांचा काय परिणाम होईल?

Chemical Weapons | रासायनिक शस्त्रे किती धोकादायक? रशिया युक्रेन युद्धात त्यांचा काय परिणाम होईल?

रशिया-युक्रेन युद्धानंतर (Russia Ukraine War) एक महिन्यानंतर रासायनिक अस्त्रांच्या (Chemical Weapons) वापराबाबत अटकळ बांधली जात आहे. या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरण्यासाठी युक्रेन रासायनिक अस्त्रे तयार करत असून ती स्वत:च्या लोकांवर वापरण्याची तयारी करत आहे, असे रशियाचे म्हणणे आहे, तर रशियाने रासायनिक हल्ल्याची तयारी केली असल्याची भीती अमेरिकेला वाटत आहे. रासायनिक अस्त्रांचा वापर या युद्धाला नवी भितीदायक दिशा देऊ शकतो.

पुढे वाचा ...
    मॉस्को, 25 मार्च : रशिया-युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) रासायनिक अस्त्रांच्या वापराबाबत (Use of Chemical Weapons) जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या शस्त्रांचा उल्लेखही सुरू झाला आहे. युक्रेनकडे जैविक आणि रासायनिक शस्त्रे असल्याचा रशियाचा आरोप हे भविष्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे रासायनिक अस्त्रांचा वापर करू शकतात, असे सूचित करतात, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापूर्वीच म्हटले आहे. या विधानामुळे जगभरात रासायनिक शस्त्रांबाबत चिंता वाढली आहे. अखेर रासायनिक शस्त्रांबद्दल इकती भीती का आहे? हे अण्वस्त्रांसारखे खूप धोकादायक आणि विनाशकारी आहेत का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या घटनेने चिंता वाढली चार दिवसांपूर्वी रशियाने युक्रेनमधील सामी येथील सोमिखिमप्रोम केमिकल प्लांटवर बॉम्बफेक केल्यावर त्यातून अमोनिया वायूची गळती सुरू झाली आणि लोकांना घरातच राहावे लागले. तज्ञांचा असा विश्वास आहे की रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने एक प्रमुख रणनीती म्हणून रासायनिक शस्त्रे वापरू शकतात. दोन्ही बाजूंना भीती एकीकडे ज्यो बायडेन म्हणतात की, रशिया युक्रेनमध्ये जैविक आणि रासायनिक शस्त्रे असल्याबद्दल बोलत आहे. तो त्यांचा वापर करण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत आहे. पुतिन यांनी यापूर्वी रासायनिक शस्त्रे वापरली आहेत. त्याचवेळी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनने आपल्याच लोकांवर रासायनिक अस्त्रांनी हल्ला करण्याची योजना आखल्याचा आरोपही केला आहे, जेणेकरून रशियावर ही शस्त्रे वापरल्याचा आरोप करता येईल. Russia-Ukraine War: काहीतरी मोठं घडणार? बायडेन यांची नाटोसोबत बैठक, रशियाची अण्वस्त्र हल्ल्याची धमकी रासायनिक शस्त्रे काय आहेत? तसे, सर्व शस्त्रांमध्ये रसायने असतात. त्यात बंदुकीच्या गोळ्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गन पावडरचाही समावेश आहे. परंतु रासायनिक शस्त्रे ही विशेष प्रकारची शस्त्रे आहेत ज्यात विषारी गुणधर्म असलेल्या वायू आणि द्रव पदार्थांचे मिश्रण असते. हे प्राणी आणि मानवांसह इतर जीवांसाठी देखील घातक ठरू शकते. डिझाइन आणि उद्देश रासायनिक शस्त्रास्त्रांचा विरोध करणारी संघटना OPCW नुसार, लढाऊ सामान, उपकरणे आणि इतर सामग्री विशेषत: विषारी रसायनांना शस्त्र बनवण्यासाठी तयार केलेली असते. हे सर्व रासायनिक शस्त्रांच्या व्याख्येत येते. सोमिखिमप्रॉममधून अमोनियाची गळती रासायनिक शस्त्रांसारखाच परिणाम करत आहे. अमोनिया हे देखील रासायनिक अस्त्र आहे का? सोमिखिमप्रॉम प्लांटमधील अमोनिया अत्यंत घातक आहे. त्याच्या अतिप्रसारामुळे दृष्टीमध्ये समस्या, फुफ्फुसांचे नुकसान आणि कधीकधी मृत्यूची शक्यता येऊ शकते. अमोनिया हे रासायनिक शस्त्र नाही. परंतु, त्याचा मुद्दाम संसर्ग किंवा अनियंत्रित प्रसार रासायनिक शस्त्राचा परिणाम देऊ शकतो. पहिल्यांदा कधी वापर झाला? पहिल्या महायुद्धात प्रथम रासायनिक शस्त्रे वापरली गेली, ज्यामध्ये क्लोरीन, गुदमरणारा फॉस्जीन आणि त्वचेला त्रास देणारा मोहरी वायू वापरण्यात आला ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी एक लाख लोकांचा बळी गेला होता. शीतयुद्धात ही शस्त्रे अधिक धोकादायक बनली असून आतापर्यंत लाखो लोक त्यांच्यामुळे मारले गेले आहेत. Russia-Ukraine War: युक्रेनच्या मदतीला धावून आला ब्रिटन, 6000 क्षेपणास्त्रं आणि आर्थिक मदतही करणार रशियाचं यात प्रभुत्व रशिया हा रासायनिक शस्त्रांचा सर्वात मोठा तज्ञ मानला जातो. याआधीही रशियावर रासायनिक अस्त्रांचा प्रचंड वापर केल्याचा आरोप होत आहे. सीरियन युद्धातही त्यांचा वापर केला गेल्याचे सांगण्यात आले आहे. रशियाने आपल्या डबल एजंटला याच शस्त्रांनी ठार मारल्याचा आरोप आहे. या युद्धात रासायनिक अस्त्रांचा वापर विनाशकारी ठरेल यात शंका नाही. रासायनिक अस्त्रांच्या वापराबाबत अमेरिका आणि नाटो रशियाला सतत इशारा देत आहेत. सध्या रशियन सैन्य हळूहळू कीवकडे सरकत आहे. त्यामुळे वळ पडली तर ते याचीही वापर करू शकतात. सध्या हे युद्ध संपण्याची आशा नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या