वॉशिंग्टन, 15 जुलै : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रन्म हे कोरोनाचा प्रसार करण्यामागे चीनला जबाबदार धरत आहे. ते वारंवार यासंदर्भातील वक्तव्यही करत आहे. आता तर ट्रम्प यांनी WHO लाही धारेवर धरलं आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला चीनच्या हातलं बाहुल म्हणून संबोधलं आहे.
ते म्हणाले की जागतिक आरोग्य संघटना वास्तवात चीनच्या हातचं बाहुल होतं. मी बऱ्याच काळापासून चीनच्या राष्टपतींशी संपर्क साधला नाही आणि यापुढे त्यांच्याशी बोलण्याची कोणतीही योजनाही नाही. आम्ही अनेक देशांना हुआवेईचा उपयोग न करण्याचं आवाहन केलं आहे. दिवसेंदिवस ट्रम्प यांचा चीनवरील राग वाढतच चालला आहे. हे वाचा- NASA चं नवं मिशन; चंद्र, मंगळानंतर आता पृथ्वीसमान दिसणाऱ्या ग्रहावर जाणार दरम्यान अमेरिकेने अनेक चिनी अधिकाऱ्यांविरोधात कथित मानवाधिकार उल्लंघनांविरोधात घातलेल्या निर्बंधानंतर चीनने सोमवारी काही उच्च अमेरिकी अधिकारी व नेत्यांवर व्हिसा निर्बंध लादून प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनईंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अमेरिकन अधिकारी आणि नेते यांच्या वर्तणुकीमुळे आणि शिनजियांग मुस्लिम बहुल प्रांतातील काही अधिकाऱ्यांविरुद्ध व्हिसा बंदीमुळे चीन-अमेरिका संबंधांना गंभीर नुकसान झाले आहे.

)







