नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : घोडेस्वारी, बॅडमिंटन, फुटबॉल, डाइविंग, हॉकी असो वा बॉक्सिंग..रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) सर्व खेळ पसंत करतात. जुडो हा त्यांचा आवडता खेळ. या खेळात ते ब्लॅकबेल्ट आहेत. ते नेहमी या खेळात सहभागी होतात. आजही वयाच्या (Russian President Vladimir Putin) 69 व्या वर्षी त्यांचा फिटनेस कमाल आहे.
शेजारील युक्रेनवर झालेल्या हल्ल्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या पुतिन यांच्या भल्या मोठ्या राष्ट्रपती राजवटीवर नजर टाकली तर लक्षात येईल की ते मुत्सद्देगिरी आणि राजकारणाचे निष्णात खेळाडू आहेत. त्यांना जिंकायला आवडतं. मात्र त्यांचा आवडता खेळ ज्युडोमध्ये अनेकदा ते पराभवी झाले आहेत. अनेकदा त्यांच्या पराभवाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुतिन जेव्हा कधी कोणत्याही खेळाच्या मैदानात उतरतात तर तेथे सहभागी होण्यासाठी घाबरत नाहीत. हा व्हिडीओ 2019 चा आहे. आपल्या इंटरनॅशनल टीमला भेटण्यासाठी जर्सी घालून मॅटवर पोहोचले आणि टीममधील महिला, पुरुष खेळाडूंसोबत लढू लागले. यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ते ऑलिंपिक चॅम्पियन महिला खेळाडू नतालिया कुजिउतिना (Natalia Kuziutina) सोबत खेळत आहेत. यादरम्यान नतालिया त्यांना खाली पटकवते. यानंतर पुतिन महिलेला शुभेच्छा देतात. असंच काहीसं 2016 मध्येही घडलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin, Russia's Putin, Viral video.