मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

कायच्या काय! हा पदार्थ खायचा की प्यायचा? वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची विचित्र डिश

कायच्या काय! हा पदार्थ खायचा की प्यायचा? वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची विचित्र डिश

चॉकलेट मॅगी, स्ट्रॉबेरी पिझ्झा, वेगन चिकन, न्युटेला बिर्यानी, च्ववनप्राश आईस्क्रिम अशा अनेक विचित्र गोष्टींची इंटरनेटवर जबरदस्त चर्चा होती. आता या विचित्र गोष्टींमध्ये डीप फ्राईड वॉटर याचा ट्रेंड सुरू आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 एप्रिल : गेल्या वर्षभरात कोरोना काळात सर्वच जण घरात काही काळ लॉकडाउनमध्ये होते. या काळात अनेकांनी विविध पदार्थ करुन पाहिले. काहींनी तर सर्वात विचित्र पदार्थांचं कॉम्बिनेशन खाल्याच्याही अनेक घटना इंटरनेट व्हायरल झाल्या होत्या. चॉकलेट मॅगी, स्ट्रॉबेरी पिझ्झा, वेगन चिकन, न्युटेला बिर्यानी, च्ववनप्राश आईस्क्रिम अशा अनेक विचित्र गोष्टींची इंटरनेटवर जबरदस्त चर्चा होती. आता या विचित्र गोष्टींमध्ये डीप फ्राईड वॉटर याचा ट्रेंड सुरू आहे.

हे कोणत्याही उकळत्या पाण्याचं फॅन्सी नाव नाही, तर 2016 मध्ये Jonathan Marcus या एका युट्यूबरने पाण्याला पीठ, अंडी, ब्रेड क्रम्स शेंगदाणा तेलात तळून एका इव्हेंटमध्ये सादर केलं होतं. आता 5 वर्षांनंतर हा विचित्र पदार्थ पुन्हा एकदा ट्रेंड होऊ लागला आहे. आता एका दुसऱ्या युट्यूबरने डिसेंबर 2020 मध्ये असचं काहीसं करण्याचा प्रयत्न केला आहे.

यूट्यूबर आणि केमिकल इंजिनिअर असलेला James Orgill हा The Action Lab नावाचं यूट्यूब चॅनेल चालवतो. त्याने एक व्हिडीओ तयार केला, ज्यात त्याने चक्क पाणी तळण्याचा प्रयत्न केला होता. water globule ही डिश तयार करण्यासाठी त्याने कॅल्शियम अल्जिनेट (calcium alginate) नावाचं एक रासायनिक कंपाउंड वापरलं. जेलिटिनसारखा हा पदार्थ जलीय कॅल्शियम क्लोराईड आणि जलीय सोडियम अल्जिनेट द्रव पदार्थाला एकत्र बांधते आणि घन अवस्थेत ठेवते.

James Orgill या युट्यूबरने हे पहिल्या प्रयत्नात पूर्ण केलं, परंतु ही एक धोकादायक क्रिया आहे. कारण पाणी आणि तेल एकत्र मिसळत नाही. water globule मधून लहानशी झालेली गळतीही स्फोटक तयार करू शकते.

जे आपल्या आहारात बऱ्याच कॅलरी घेण्याचा विचार करत नाहीत, त्यांच्यासाठी हे चांगल्याप्रकारे कार्य करत असल्याचंही त्याने सांगितलं. हे पाण्याचे गोळे अर्थात water globule करताना पीठ, अंडी, ब्रेड क्रंब्समध्ये कोट करून गरम तेलात तळले. या व्हिडीओमध्ये तो या डिशमागचं, या रेसिपीमागचं सायन्स सांगतो आणि या डिशचं वर्णन ‘raw jellyfish’ असं करतो.

Vice ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, पाण्याचं खाण्याच्या एखाद्या पदार्थामध्ये रुपांतर करणं हे आश्चर्यकारक आहे. पाणी अशाप्रकारे तळणं हे विनोदी वाटू शकतं. परंतु याच्या चवीबद्दल बोलताना त्याने, या पदार्थाला तसा कोणताही फ्लेवर नसून काहीसं सॉल्टी असल्याचं म्हटलं होतं.

First published: