मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'हम दो, हमारे तीन'; तब्बल 35 वर्षांनी चीन सरकार अवलंबणार आता नवं धोरण

'हम दो, हमारे तीन'; तब्बल 35 वर्षांनी चीन सरकार अवलंबणार आता नवं धोरण

जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून अवकाश विज्ञानापासून पायाभूत सुविधांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि लपूनछपून उद्योग करणाऱ्या चीनला (China) आता काम करणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Meenal Gangurde

चीन, 1 जून : जागतिक महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून अवकाश विज्ञानापासून पायाभूत सुविधांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि लपूनछपून उद्योग करणाऱ्या चीनला (China) आता काम करणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत चीन जगात सर्वोच्च स्थानावर आहे; मात्र आता चीनमध्ये तरण्या ताठ्या मंडळींची उणीव जाणवते आहे. त्याचा दूरगामी परिणाम समाजाच्या रचनेवर आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. म्हणूनच आता एका जोडप्याला तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी तिथल्या सरकारतर्फे दिली जाणार आहे. चीनच्या झिनुआ (Xinhua News Agency) या अधिकृत सरकारी माध्यमाचा हवाला देऊन 'बिझनेस स्टँडर्ड'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

लोकसंख्यावाढीचा (Population) वेग पाहून 1980 मध्ये चीनच्या सरकारने वन चाइल्ड पॉलिसी (One Child Policy) अर्थात दाम्पत्यांनी एकाच मुलाला जन्म देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. त्या धोरणाची अत्यंत कडक अंमलबजावणी देशात करण्यात आली होती. धोरणाचं उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूदही होती. त्यानंतर अपेक्षेनुसार त्या देशाचा जन्मदर घटला. मोठ्या वयाच्या लोकांची, वृद्धांची लोकसंख्या वाढू लागली. त्यामुळे तब्बल 35 वर्षांनी सरकारने या धोरणाचा फेरविचार करून त्यात सवलत देण्याचा विचार केला. त्यामुळे 2015पासून एका दाम्पत्याला दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर लगेचच्या वर्षी म्हणजे 2016मध्ये जन्मदरात वाढ झाल्याचं दिसून आलं; मात्र नंतरच्या काळात पुन्हा जन्मदराला उतरती कळाच लागल्याचं सरकारच्या लक्षात आलं. त्या पार्श्वभूमीवर आता चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी (Communist Party) एका दाम्पत्याला तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेणार आहे.

हे ही वाचा-'चीनमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; वटवाघळाचा फक्त बहाणा'

चीनमधलं वर्किंग एज पॉप्युलेशन (Working Age Population) म्हणजे तरुण वयातल्या लोकसंख्येचं प्रमाण गेल्या दशकात घटत असल्याचं जनगणनेवरून दिसून आलं आहे. तसंच, 65 वर्षांवरची लोकसंख्या असल्याचंही दिसत आहे. या दोन्ही गोष्टींमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि समाज या दोन्हींवर ताण येत आहे. त्यामुळेच आता एका दाम्पत्याला तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली जाणार आहे. सोमवारी (31 मे) सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरोची बैठक झाली. 'लोकसंख्येचं सरासरी वय वाढत असण्याच्या समस्येचा सामना करण्यासाठी चीन महत्त्वाची धोरणं लागू करील,' असा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त तिथल्या अधिकृत सरकारी माध्यमाने दिलं आहे.

चीनच्या लोकसंख्येच्या संरचनेत सकारात्मक बदल होण्यासाठी तीन मुलांना जन्म देण्याचं धोरणं, तसंच त्याला धोरणाला साजेशा अन्य उपाययोजना उपयुक्त ठरतील, असा सूर त्या बैठकीत निघाला. त्यामुळे 'हम दो हमारा एक'वरून आता 'हम दो हमारे तीन'पर्यंत चीनची वाटचाल झाली आहे.

First published:

Tags: China, Elderly population