Home /News /videsh /

रशिया-युक्रेन युद्धात अडकली पुतिन यांची गर्लफ्रेंड; याठिकाणी 3 मुलांसह आलिशान व्हिलामध्ये लपली, विरोधात 50 हजार लोकांच्या याचिका

रशिया-युक्रेन युद्धात अडकली पुतिन यांची गर्लफ्रेंड; याठिकाणी 3 मुलांसह आलिशान व्हिलामध्ये लपली, विरोधात 50 हजार लोकांच्या याचिका

पुतिन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) अडकली आहे. अलिना स्वित्झर्लंडमध्ये लपून बसली असल्याचं बोललं जात आहेत.

नवी दिल्ली 22 मार्च : रशिया-युक्रेन युद्ध 24 फेब्रुवारी 22 पासून सुरू आहे. बलाढ्य रशियाला युक्रेनने कडवी टक्कर दिली असून ते आत्मसमर्पणासाठी तयार नाहीत. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात अनेक घटना घडत आहेत. महागाई वाढली आहे, तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चांना उधाण आलंय तसंच इतरही काही घटना घडत आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाइवा (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) रशिया-युक्रेन युद्धात (Russia-Ukraine War) अडकली आहे. अलिना स्वित्झर्लंडमध्ये लपून बसली असल्याचं बोललं जात आहेत. पुतीन यांची गर्लफ्रेंड स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland ) सुरक्षित ठिकाणी असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. रशिया, युक्रेन आणि बेलारूसमधील नागरिकांनी अलिनाच्या विरोधात ऑनलाईन याचिका केली असून, तिला स्वित्झर्लंडमधून हाकलून लावण्याची मागणी केली आहे.

..म्हणून Mariupol प्रतिष्ठेचा प्रश्न;ताबा मिळवण्यासाठी रशिया-युक्रेनमध्ये संघर्ष

माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, अलिना तिच्या तीन मुलांसह एका आलिशान व्हिलामध्ये लपून बसली आहे. ऑनलाईन याचिकेच्या समर्थनार्थ आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याचिकेत म्हटलंय की, युद्ध सुरू असूनही स्वित्झर्लंड पुतीन यांच्या मैत्रिणीची मदत करतंय. युक्रेनमधील युद्धादरम्यान अलिनाला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या आणि त्यानंतर ही याचिका करण्यात आली आहे. दैनिक भास्करने या संदर्भात वृत्त दिलंय. अलिना 38 वर्षांची असून तिने ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. अलिना रशियातील सर्वात लवचिक (flexible) महिला म्हणून ओळखली जाते. ती पुतीन यांच्या युनायटेड रशिया पार्टीची खासदारही राहिली आहे. अलिना 7 वर्षांहून अधिक काळ रशियन सरकार समर्थित नॅशनल मीडिया ग्रुपच्या संचालक मंडळाची अध्यक्ष आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, तिला दरवर्षी सुमारे 8 दशलक्ष युरो पगार मिळतो.

जगावर तिसऱ्या महायुद्धाचं संकट? या कारणामुळे युक्रेनच्या मदतीस तयार नाही NATO

अलिना पुतिन यांच्या तीन मुलांची आई असल्याचं म्हटलं जातं. मात्र, याबद्दल अधिकृत माहिती कधीही समोर आलेली नाही. रशियन मीडियाने 18 वर्षीय एलिझाबेथ क्रिव्होनोगिख पुतिनची सिक्रेट मुलगी असल्याचं अनेकदा म्हटलंय. पुतिन यांच्या सिक्रेट मुलीबाबत, ब्रॅडफोर्ड विद्यापीठ, यूके येथील व्हिज्युअल कम्प्युटिंग सेंटरचे संचालक प्रा. हसन उगेल म्हणाले होते की, पुतिन आणि त्यांच्या कथित मुलीचा चेहरा सारखा आहे. ते दोघे हुबेहूब एकमेकांसारखे दिसतात, त्यामुळे त्यांना पाहिल्यावर हे दोघे बाप-लेक असल्याचं कोणीही नाकारू शकत नाही. अलिना एक यशस्वी जिम्नॅस्ट आहे. तिनं ऑलिम्पिकमध्ये दोन गोल्ड मेडल, 14 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला आणि पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची खासदार बनली. अलिना आणि पुतिन यांचं नाव 2008 मध्ये पहिल्यांदा एकमेकांशी जोडलं गेलं होतं. अलिना शेवटची 2018 मध्ये जाहीर मंचावर दिसली होती तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर होती. त्यानंतर 2019 मध्ये मॉस्कोमधील रुग्णालयात अलिनाने दोन मुलांना जन्म दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अलिना पुन्हा चर्चेत आली आहे. तिला हकलून देण्याची मागणी होत आहे.
First published:

Tags: Russia Ukraine, Vladimir putin

पुढील बातम्या