मॉस्को, 06 नोव्हेंबर : जगातील सर्वात शक्तीशाली नेता आणि गेल्या 20 वर्षांपासून राज्य करणारे व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) 2021मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांची प्रेयसी जिमनास्ट अलीना कबाइला आणि तिच्या दोन मुलींना पुतीन यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. असा दावा केला जात आहे की पुतिन पार्किन्सन (Parkinson ) आजाराशी झुंज देत आहेत. अलीकडेच पुतिन यांचे काही फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर ते गंभीर आजारी असल्याचे स्पष्ट झाले होते.
मॉस्कोचे राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवे यांनी ब्रिटीश वृत्तपत्र द सनला सांगितले की, रशियाचे राष्ट्रपती यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली यांनी पुतिन यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. ते म्हणाले, 'पुतीन यांचे एक कुटुंब आहे आणि त्यांचा रशियन राष्ट्रपतींवर खोल प्रभाव आहे. जानेवारीत पुतिन सर्व अधिकार दुसऱ्याला देऊन राष्ट्रपतीपद सोडू शकतात.
Vladimir Putin 'will quit as Russian President amid fears he has Parkinson's disease' https://t.co/uVwakKdUmK
— Daily Mail Online (@MailOnline) November 6, 2020
काही दिवसांपूर्वी पुतिन यांचे काही फोटो समोर आले होते. यात त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे दिसले होते. द सनच्या वृत्तानुसार, पुतिन यांची तब्येत खालावली आहे. नुकत्याच एक बैठकीत त्यांच्या हातात औषधं असल्याचे दिसले होते. पुतिन यांच्या राजीनाम्याच्या चर्चा अशा वेळी समोर आल्या आहेत जेव्हा रशियन सभासद एका विधेयक आणण्याच्या विचारात आहेत. या विधेयकामुळे त्यांची फौजदारी कारवाईतून आजीवन सुटका होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin