भविष्यातील महासाथीपासून जगाला वाचवणारे 'व्हायरस हंटर्स'

भविष्यातील महासाथीपासून जगाला वाचवणारे 'व्हायरस हंटर्स'

व्हायरस हंटर्स (Virus Hunters) जगभरातील वटवाघळांपर्यंत पोहोचून कोरोनाव्हायरसचा (coronavirus) शोध घेतात. 

  • Share this:

नवी दिल्ली, 30 एप्रिल : सध्या कोविड-19 व्हायरसशी संपूर्ण जग लढा देत आहे. हा व्हायरस आणि त्याच्यावरील औषधाचा शोध अद्यापही सुरू आहे. जगभरातील शास्त्रज्ञ सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) उपाय शोधत आहेत. तर दुसरीकडे काही शास्त्रज्ञ भविष्यात मानवासाठी घातक ठरणाऱ्या अशा अशा हजारो कोरोनाव्हायरसचा शोध घेत आहेत, जेणेकरून त्यापासून बचाव करता येईल.

वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत कित्येक शास्त्रज्ञ व्हायरस हंटर्सच्या (virus hunters) रूपात जगभरात नव्या कोरोनाव्हायरसचा शोध घेतात जेणेकरून जगाला महासाथींपासून वाचवता येईल. हे व्हायरस हंटर्स थेट वटवाघळांच्या (bats) गुफेत जातात.

हे वाचा - कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी 100 वर्ष जुन्या महासाथीत डोकावण्याची गरज

फेस मास्क, ग्लोव्हज आणि विशेष सूट अशा पद्धतीने पूर्ण शरीर झाकून व्हायरस हंटर्स वटवाघळांच्या गुफेत प्रवेश करतात, जेणेकरून वटवाघळांच्या मलमूत्राशी संपर्क येणार नाही. दिवसभर ते या गुफेत तयारी करून ठेवतात म्हणजे रात्री वटवाघळं गुफेत परतल्यानंतर जाळ्यात अडकतील आणि रात्र होण्याची प्रतीक्षा करतात. अंधार झाल्यानंतर हजारोंच्या संख्येनं वटवाघळं या गुफेत परततात आणि संशोधकांच्या जाळ्यात फसतात. त्यानंतर संशोधक आपल्या जाळ्यात अडकलेल्या या वटवाघळांना माइल्ड अॅनेस्थिशिया देतात आणि त्यांचे रक्त, पंख, स्वॅचे नमुने घेतात. यावेळी शरीराचा कोणताही भाग वटवाघलांना थेट स्पर्श होणार नाही, याची काळजी घेतली जाते.

कित्येक वर्षांपासून व्हायरसचा शोध

नवीन व्हायरस आणि महासाथीला रोखण्यासाठी हे शास्त्रज्ञ कित्येक वर्षापासून असे काम करत आहेत. असंच काम करणारी अमेरिकेतील एनजीओ एको हेल्थ अलायन्सेसचे शास्त्रज्ञ पीटर दसजैक सांगतात की आम्ही प्रत्येक प्रकारचे नमुने जमा करतो, ज्याची पुढे रिसर्चमध्ये मदत होईल. पीटर हे काम गेल्या दहा वर्षांपासून करत आहेत. आतापर्यंत 20 देशांमध्ये फिरून त्यांनी वटवाघळांचे नमुने जमा केलेत, ज्याच्यामुळे भविष्यात कोणती महासाथ पसरणार आहे, हे सांगितलं जाऊ शकेल.

हे वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण कायम; दिल्लीनंतर मुंबईतही प्लाझ्मा थेरेपी यशस्वी

2003 साली सार्स महासाथ पसरण्यापूर्वी कोरोनाव्हायरसबाबत फारसं संशोधन नव्हतं केलं जात. सिंगापूरचे व्हायरोलॉजिस्ट वँग लिंफा यांच्या मते, कोरोनाव्हायरसबाबत इतक्या मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू नव्हतं झालं. त्याआधी माणसांमध्ये संक्रमित होणाऱ्या फक्त 2 व्हायरस सापडले होते. त्यांचा शोध 1960 च्या दशकात लागला होता.

500 नवे कोरोनाव्हायरस सापडले

पीटर आणि त्यांच्यासारख्या इतर शास्त्रज्ञांच्या मदतीमुळे वटवाघळामार्फत कोणता व्हायरस माणसांमार्फत पोहोचू शकतो, याची माहिती मिळण्यास मदत होईल. पीटर यांनी सांगितलं, "मी आतापर्यंत 15 हजार वटवाघळांचे नमुने जमा केलेत. त्यामुळे जगभरात जवळपास 500 नव्या कोरोनाव्हायरसची माहिती मिळाली आहे. यापैकीच एक 2013 साली सापडला होता, जो कोविड-19 च्या परिवारातीलच एक भाग आहे, असं मानलं जातं आहे. वटवाघळांमध्ये अंदाजे जवळपास 15 हजार कोरोनाव्हायरस असू शकतात"

हे वाचा - Make In Indiaच्या जोरावर चीनला टक्कर, भारतच स्वबळावर कोरोनाला हरवणार

पीटर ज्या संस्थेत काम करतात, ती संस्था जास्त करून दक्षिण-पूर्व चीनवर लक्ष केंद्रीत करते, जो यूनान प्रांतात आहे. हे क्षेत्रात वटवाघूळ भरपूर संख्येनं असल्यासाठी ओळखलं जातं. पीटर सांगतात या ठिकाणावर जास्त लक्ष केंद्रीत केलं जातं कारण इथूनच सार्सला सुरुवात झाली असं मानलं जातं.

अमेरिकेची अशीच एक संस्था प्रेडिक्ट जवळपास 31 देशांमध्ये व्हायरसचा शोध घेते. Smithsonian Institution शी संबंधित असणाऱ्या या संस्थेने आता म्यानमार आणि केन्यावर लक्ष केंद्रीत करणं सुरू केलं आहे. संस्थेच्या सुझान मुर्रे यांच्या मते, आतापर्यंत रिसर्चमध्ये म्यानमारमध्ये 5 कोरोनाव्हायरस शोध लागला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 30, 2020, 12:05 PM IST

ताज्या बातम्या