मुंबई, 29 एप्रिल : कोरोनाग्रस्तांसाठी (coronavirus) एकमेव आशेचा किरण असलेली प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) सध्या प्रायोगिक तत्वावर आहे, उपचार म्हणून त्याला मान्यता मिळालेली नाही, असं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) म्हटलं आहे. तरीही कोरोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण कायम आहे. कारण दिल्लीनंतर आता मुंबईतही (Mumbai) कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयातील कोरोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी (Rajesh tope) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा - Lockdownमुळे अडकून पडलेल्या लोकांना केंद्राचा दिलासा, तपासणी झाल्यावर जाता येणार घरी राजेश टोपे यांनी सांगितलं की, “लिलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. ही थेरेपी यशस्वी झाली असल्याची माहिती, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरेपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे" “ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरेपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे”, असं राजेश टोपे म्हणालेत. हे वाचा - कोरोनाविरोधात एकमेव आशेचा किरण असलेल्या Plasma therapy बाबत ICMR चं मोठं स्पष्टीकरण याआधी दिल्लीतील एका खासगी रुग्णालातील 49 वर्षीय गंभीर कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरेपीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर 4 दिवसांतच या रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं होतं.
“दरम्यान कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी प्रभावी ठरेल, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे भारतात आणि यूएसमध्येही या थेरेपीचा कोरोना रुग्णांवर प्रयोग केला जातो. उपचार म्हणून मान्यता नाही. प्लाझ्मा थेरेपीमध्ये अनेक धोकेही आहेत. अॅलर्जिक रिअॅक्शन आणि फुफ्फुसाला हानी पोहोचून ही थेरेपी जीवघेणीही ठरू शकते”, असं ICMR ने सांगितलं आहे. काय आहे प्लाझ्मा थेरेपी? दिल्लीतील AIIMS चे रणदीप गुलेरिया म्हणाले, “व्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील.” जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं, असं डॉक्टरांनी सांगितलं. संकलन, संपादन - प्रिया लाड