Home /News /mumbai /

EXCLUSIVE: महाविकास आघाडीची 'वर्षा'वर बैठक, 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ, मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

EXCLUSIVE: महाविकास आघाडीची 'वर्षा'वर बैठक, 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ, मुंबईत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग

शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवार यांची घोषणा केली असली तरी मुंबईतील घडामोडी काहीतरी वेगळंच भासवत आहेत. या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेला जात आहेत याचा अंदाज आताच बांधणं कठीण आहे.

मुंबई, 24 मे : राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीबाबत (Rajya Sabha Election) अद्यापही सस्पेन्स कायम असल्याचं चित्र आहे. कारण शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची घोषणा केली असली तरी मुंबईतील घडामोडी काहीतरी वेगळंच भासवत आहेत. या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेला जात आहेत याचा अंदाज आताच बांधणं कठीण आहे. पण आगामी काळात जे घडणार आहे त्या पार्श्वभूमीवर आता जे घडतंय ते महत्त्वाचं मानलं जात आहे. राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने खास बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीची सबंधित बैठक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजीराजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार? विशेष म्हणजे ही बैठक आयोजित करण्यात आली असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या (rajya sabha election 2022) सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी मिळणार अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, खासदार संभाजीराजे यांच्या नावावरून अजूनही सस्पेन्स कायम आहे. संभाजीराजे मुंबईत दाखल झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली होती. मात्र, शिवसेनेकडून त्यांना ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर आता सेनेकडे उमेदवाराची अधिकृत घोषणेची तयारी सुरू आहे. आता संभाजीराजे हे मुंबईत दाखल झाले आहे. कोल्हापूरमधून संभाजीराजे मुंबईत पोहोचले आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही संघटना संभाजीराजे यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर संभाजीराजे हे पुढील रणनीती ठरवणावर आहे. पण, त्यांना अजूनही शिवसेनेनं पाठिंबा द्यावी, अशी अपेक्षा आहे. (संभाजीराजे मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता) 'सह्याद्री'वर नेत्यांची वर्दळ या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना याच घडामोडींना समांतर अशी घडामोड मुंबईतच सह्याद्री अतिथीगृह येथे घडताना दिसत आहे. सह्याद्री अतिथीगृहावर नेत्यांची वर्दळ सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सारखे दिग्गज मंत्री या बैठकीसाठी हजर झाले आहेत. सह्याद्री अतिथीगृहाच्या दुसऱ्या मजल्यावर एक खास बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत या दोघा नेत्यांसह 3 अपक्ष आमदार आहेत. संजय घोडके, मुफ्ती महंमद इस्माईल, यशवंत माने या अपक्ष आमदारांचा यामध्ये समावेश आहे. या सगळ्या घडामोडी पाहता मुंबईत नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरु आहेत, याचा आताच अंदाज बांधणं कठीण असल्याचं चित्र आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या