बैरुत, 4 ऑगस्ट : लेबननची राजधानी बैरुतमध्ये भीषण स्फोट झाला आहे. देशाच्या स्वास्थ मंत्र्यांनुसार लेबनानची राजधानी बेरुतमध्ये भयंकर स्फोट झाल्याने शेकडो लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या या जबरदस्त स्फोटामुळे अनेक भागात धक्का बसला आहे. स्फोटानंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट राजधानीच्या बंदराच्या भागात झाला, येथे अनेक गोदाम आहेत.
सेंट्रल बैरूतमध्ये संध्याकाळी दोन मोठे स्फोट झाले. लेबननमध्ये असणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहावं, असं आवाहनही करण्यात आहे.
2 big explosions heard in Central Beirut this evening. Everyone is advised to stay calm. Any Indian community member in need of any help, may contact our Help Line. @MEAIndia@SecySanjaypic.twitter.com/xWlgU8WdNB