मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Russia Plane Crash: 28 प्रवाशांसह विमान झालं गायब; अपघातामागे ‘हे’ कारण असल्याचा दावा

Russia Plane Crash: 28 प्रवाशांसह विमान झालं गायब; अपघातामागे ‘हे’ कारण असल्याचा दावा

रशियाचं AN-36 हे प्रवासी विमान गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 28 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या या विमानाचा काही वेळातच संपर्क तुटला आणि त्यानंतर हे विमान कोसळलं.

  • Published by:  desk news

मॉस्को, 6 जुलै: रशियाचं AN-36 हे प्रवासी विमान (Passenger Plane) गायब झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 28 प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या या विमानाचा (Plane) काही वेळातच संपर्क तुटला आणि त्यानंतर हे विमान कोसळलं (Plane Crashed). मात्र ते नेमकं कुठे कोसळलं आणि कशामुळे हा अपघात (Accident) झाला, याच अजूनही शोध घेतला जात आहे. या विमानातील सर्वच्या सर्व 28 जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

असा झाला अपघात

पेट्रोपावलोव्स्क शहरातून पलानाकडे हे विमान जात असताना वाटेत त्याचा संपर्क तुटल्याची बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिली आहे. विमानातील 28 प्रवाशांपैकी 6 हे कॅबिन सदस्य होते. समुद्राच्या वरून उडत असताना काही कारणामुळे विमान क्रॅश झालं आणि समुद्रात कोसळलं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी रशियात प्रचंड ढग होते. ढगाळ वातावरणामुळे विमानावरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाजही काही वृत्तसंस्थांनी व्यक्त केला आहे. तर इंटरफॅक्स नावाच्या वृत्तसंस्थेनं याहून वेगळा दावा केला आहे. पलाना शहराला लागून असलेल्या कोळसा खाणींच्या परिसरात हे विमान कोसळल्याचा दावा या संस्थेनं केला आहे.

शोधकार्य सुरू

दोन हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सध्या या विमानाचा शोध घेण्यात येत आहे. ढगाळ हवामानामुळे शोधकार्यातही अडथळे येत असल्याची माहिती आहे. कोळसा खाणीच्या परिसरात आणि इतरत्रही बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतरच या अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळू शकते, असं सांगितलं जात आहे.

हे वाचा -पोहता येत नसेल तरी 'या' समुद्रात बिनधास्त घ्या उडी; बुडण्याची शक्यताच नाही

जुनी विमानं

हे अपघातग्रस्त विमान ऍंटोनोव्ह कंपनीचं असून 1969 ते 1986 या काळात ही विमानं तयार करण्यात आली होती. छोट्या आकाराची आणि सैनिकांची ने-आण करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ही विमानं होती. ही विमानं जुनी झाल्यामुळे ती आंतरराष्ट्रीय सेवेतून बाद करून केवळ देशांतर्गत सेवेसाठी वापरली जात होती. विमानांना सेवेत घेण्याचे निकष रशियानं काही दिवसांपूर्वीच कडक केले आहेत. मात्र तरीही हा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Airplane, Crash, International, Russia