Home /News /videsh /

युद्धाचे ढग! अमेरिकेनं युक्रेनमध्ये पाठवला मोठा शस्त्रसाठा, रशियाला इशारा

युद्धाचे ढग! अमेरिकेनं युक्रेनमध्ये पाठवला मोठा शस्त्रसाठा, रशियाला इशारा

अमेरिकेनं युक्रेनमध्ये मोठा शस्त्रसाठा पाठवून दिला आहे. त्यामुळे युद्धाची छाया अधिक गडद झाली असून तणाव वाढला आहे.

    किव्ह, 23 जानेवारी: अमेरिकेनं (America) शस्त्रास्त्रांचा (Weapons) मोठा साठा (Lethal aid) युक्रेनला (Ukraine) धाडला आहे. रशियानं (Russia) युक्रेनच्या सीमेवर (Ukraine border) आपलं सैन्य तैनात केल्यानंतर अमेरिकेनं युक्रेनला शस्त्रे आणि दारुगोळा यांचा मोठा साठा पाठवला असून यामुळे परिस्थितीतील तणाव अधिकच वाढला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युक्रेनला दिलेल्या सरप्राईज भेटीनंतर हालचालींना वेग आला आहे. रशियानं काही आगळीक केलीच, तर स्वसंरक्षणासाठी युक्रेनकडे पुरेसा शस्त्रसाठा असणं गरजेचं असल्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. 90 टन शस्त्रे अमेरिेकेकडून आतापर्यंत युक्रेनला 90 टन शस्त्रे पुरवण्यात आली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या शस्त्रांवर खर्च करण्यासाठी 200 मिलियन डॉलरच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. भारतीय चलनात ही रक्कम होते जवळपास दीड लाख कोटी रुपये. रशियाविरुद्धच्या लढाईत आत्मसंरक्षणासाठी हा शस्त्रसाठा युक्रेनला पाठवत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. रशियाने युक्रेनमध्ये घुसरखोरी करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये, असा इशाराही अमेरिकेनं दिला आहे. रशियाची प्रतिक्रिया युक्रेनवर हल्ला करण्याचा आपला कुठलाही इरादा नसल्याचं रशियानं स्पष्ट केलं आहे. यापूर्वीही अनेकदा रशियानं आपली ही भूमिका समोर मांडली आहे. मात्र रशियाची कृती त्या देशाच्या विधानांना साजेशी दिसत नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून रशियानं आपलं 1 लाख सैन्य युक्रेनच्या सीमेवर तैनात केलं आहे. या प्रकारे रशिया युक्रेनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देश हे रशियाच्या विरोधात भूमिका घेत असून तणाव वाढला आहे. हे वाचा-पंतप्रधानांनी लिव्हइनमध्ये असताना दिला बाळाला जन्म; देशहितासाठी रद्द केलं लग्न काय आहे प्रकरण? युक्रेनचा समावेश नाटोमध्ये करण्यास रशियाचा विरोध आहे. अमेरिका आणि नाटोनं युक्रेनचा समावेश नाटोमध्ये करणार नाही, असं लेखी आश्वासन देण्याची मागणी रशियाने केली आहे. मात्र अमेरिका अशी कुठलीही हमी देण्याच्या मनस्थितीत नाही. यावरून दोन्ही देशांत परराष्ट्र मंत्री पातळीवर चर्चाही सुरू आहेत, मात्र प्रत्यक्षात युक्रेनमधील तणाव वाढतच असल्याचं चित्र आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Russia, Ukraine news, War, Weapons

    पुढील बातम्या