मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जो बायडन यांची प्रकृती ठीक नाही? स्टेजवर घडलेल्या त्या प्रकारामुळे उपस्थितांना बसला धक्का; Video

जो बायडन यांची प्रकृती ठीक नाही? स्टेजवर घडलेल्या त्या प्रकारामुळे उपस्थितांना बसला धक्का; Video

जो बायडन न्यूयॉर्कमध्ये (New York) एका कार्यक्रमाला बोलत होते, त्यांनी भाषण केलं, त्यांच्या भाषणाला उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यानंतर ते स्टेजवरून खाली येऊ लागले. पण...

जो बायडन न्यूयॉर्कमध्ये (New York) एका कार्यक्रमाला बोलत होते, त्यांनी भाषण केलं, त्यांच्या भाषणाला उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यानंतर ते स्टेजवरून खाली येऊ लागले. पण...

जो बायडन न्यूयॉर्कमध्ये (New York) एका कार्यक्रमाला बोलत होते, त्यांनी भाषण केलं, त्यांच्या भाषणाला उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यानंतर ते स्टेजवरून खाली येऊ लागले. पण...

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 23 सप्टेंबर : एखाद्या देशाचा राष्ट्रपती स्टेजवरून खाली उतरण्याचा रस्ताच विसरला, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही, पण हे पूर्णपणे खरंय. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. जो बायडन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते भ्रमिष्ट होऊन रस्ता विसरल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच ते सध्या चर्चेत आहेत.

  हिजाब घातला नाही म्हणून पोलिसांकडून भयंकर शिक्षा, 22 वर्षीय अमिनीचा दुर्देवी मृत्यू

  जो बायडन न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाला बोलत होते, त्यांनी भाषण केलं, त्यांच्या भाषणाला उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यानंतर ते स्टेजवरून खाली येऊ लागले. पण डायसपासून थोडं समोर चालल्यावर ते स्टेजवरून खाली उतरायचा रस्ता विसरले आणि स्टेजवरच हरवले. अचानक भ्रमिष्ट झाल्याने त्यांना स्टेजवरून खाली उतरणं किंवा उतरून पुढे जाणं या क्रियाच सुचल्या नाहीत.

  या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही संपूर्ण घटना न्यूयॉर्कमध्ये आयोजित ग्लोबल फंड्स सेव्हंथ रिप्लेनिशमेंट कॉन्फरन्सदरम्यान घडली. या कॉन्फरन्समध्ये ते भाषण करत होते. पण जेव्हा ते स्टेजवरून खाली उतरायला गेले तेव्हा रस्ता विसरले आणि हे पाहून उपस्थितांनाही धक्का बसला.

  त्यादरम्यान तिथे उपस्थित शोच्या होस्टने प्रकरण हाताळत लोकांना संबोधित केलं. त्यामुळे लोकांचं लक्ष बायडन यांच्यावरून दूर झालं. होस्टने थँक्यूची नोट वाचली आणि तेवढ्यात बायडन यांना स्टेजवरून खाली उतरण्याचा रस्ता दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 58 लाख लोकांनी पाहिलाय आणि अनेक युजर्स हा व्हिडिओ शेअरदेखील करत आहेत.

  बायडन यांच्याबाबत याआधीही असंच घडलंय

  जो बायडन एप्रिलमध्ये भाषण देत होते. यानंतर त्यांनी हँडशेकसाठी हात पुढे केले होते, पण त्यावेळी त्यांच्याशी हँडशेक करण्यासाठी त्यांच्यासमोर कोणीही नव्हतं, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. दोनवेळा अशी घटना घडल्याने बायडन यांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा होत आहे.

  बायडन ज्या कार्यक्रमात गेले होते, त्याचा उद्देश एड्स, टीबी आणि मलेरियाशी लढण्यासाठी निधी गोळा करणं हा होता. यासाठी 14.25 अब्ज डॉलरचा निधीही उभारण्यात आला आहे. 'हा लढा दिल्याबद्दल धन्यवाद. हे सर्व लोकांचे जीव वाचवण्यासाठी आहे. समाज निरोगी आणि मजबूत राहील, हे पार्टनर्सबरोबर काम करून निश्चित केलं जातंय,’ असं बायडन यावेळी म्हणाले.

  First published:
  top videos

   Tags: Joe biden