वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : 3 नोव्हेंबर म्हणजेच अवघ्या दोन दिवसात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेतील पक्षांच्या प्रचारसभा जोरजोरात सुरू आहेत. पुन्हा ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणार की जो बायडन बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटीक पक्षाचे जो बायडन यांच्यात काटेकी टक्कर आहे.
दरम्यान जो बायडन यांची प्रचारसभेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचे फ्लोरिडा येथे भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. मात्र तरीही त्यांनी भाषण थांबवल नाही. ते तसेच पावसात भिजत असताना बोलत राहिले. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी शरद पवारांच्या साताऱ्यामधील भाषणाची आठवण आली आहे. राष्ट्रावादीचे शरद पवार साताऱ्यात सभेला संबोधित करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला. यानंतर अनेकजण मागे झाले, मात्र पवार तेथेच उभे राहून भाषण करीत होते. त्याच्या या सभेचा निवडणुकीच्या प्रचारावर मोठा प्रभाव दिसून आला होता. त्यातच बायडन यांच्या या सभेनंतरही अशात करिष्मा घडणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
जो बायडेन यांचं फ्लोरिडा येथील भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवलं. गेल्या वर्षी साताऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक पाऊस आला होता. त्यावेळी त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरू ठेवलं होतं. त्याचा निवडणुकीतील प्रचारावर मोठा प्रभावही दिसून आला होता.
जो बायडेन यांनी त्यांच्या ट्विट अकाऊंटवरुन भरपावसात सुरू असलेल्या प्रचारसभेचा फोटो शेअर केला आहे. यावर त्यांनी लिहिलं आहे की, हे वादळ जाईल आणि नवा दिवस उजाडेल. फ्लोरिडामध्ये बायडन यांचे भाषण सुरू होते. त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला. मात्र यानंतरही बायडन भरपावसात भाषण देत होते. सध्या या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.