ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडनदेखील राष्ट्राध्यक्ष म्हणून एकच टर्म पूर्ण करणार?

ट्रम्प यांच्याप्रमाणे बायडनदेखील राष्ट्राध्यक्ष म्हणून एकच टर्म पूर्ण करणार?

कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात देखील अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी (US Presidential Election) निवडणूक पार पडली.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 नोव्हेंबर : कोरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात देखील अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी (US Presidential Election) निवडणूक पार पडली. यामध्ये जो बायडन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत या निवडणुकीत यश मिळवले. आज बायडन आपला 78 वा वाढदिवस साजरा करत असून सर्वात जास्त वय असलेले ते अमेरिकेचे पहिले राष्टाध्यक्ष ठरणार आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत त्यांच्या सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

या निवडणुकीचे वारे अजूनपर्यंत थांबत नाही तोपर्यंत पुढच्या निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पुढील निवडणूक 2024 ला होणार असून त्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली तर 2028 मध्ये त्यांचे वय 86 होणार आहे. अमेरिकेच्या इतिहासात इतक्या वर्षाचे कुणीही राजकारणी राहिलेले नाही. वय जास्त झाल्यामुळे त्यांना पुढील प्रचारात जास्त सामील होता येणार नाही. तसेच या निवडणुकीच्या प्रचारात देखील ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल स्पष्ट बोलताना दिसून येत नव्हते. एप्रिलमध्ये आपल्या निवडणुकीसाठी फंड जमा करण्याच्या एका कार्यक्रमात त्यांनी स्वतःला ट्रान्झिशन कँडिडेट म्हटले होते. म्हणजे एका राष्ट्राध्यक्षांकडून सत्ता घेऊन दुसऱ्या वेळी दुसऱ्या राष्ट्रपतीला सोपवणे. त्यांनतर त्यांच्या या विधानानंतर चर्चांना ऊत आला होता. यानंतर प्रचारात त्यांनी कधीही यावर भाष्य केले नाही.

ऑगस्टमध्ये एबीसी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण पुढील दोन टर्मचा विचार करत असल्याचे म्हटले होते. परंतु या टर्ममध्ये आपली सत्ता पूर्ण करून डेमोक्रॅट्सच्या तरुण उमेदवारांना ते मार्ग मोकळा करणार आहेत. बायडन अमेरिकेच्या राजकारणात मागील 50 वर्षांपासून आहेत. 1972 मध्ये ते सर्वात आधी सिनेटमध्ये निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता वय झाल्याने ते एवढी टर्म पूर्ण करून राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात. स्वतःला ट्रांजिशन कँडिडेट म्हटल्याने चर्चाना उधाण आले होते परंतु हे विधान त्यांनी सहजच म्हटल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

बायडन यांची बहीण वेलेरी यांनी  त्यांच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन केले होते. त्यांनी देखील बायडन पुढील टर्मसाठी दावा करणार असल्याचे म्हटले आहे.  न्यूज 18 इंग्लिशने एचबीओच्या हवाल्याने वेलेरी यांच्या या वक्तव्याचा उलेल्ख केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले बायडन यांच्या ट्रांजिशन कँडिडेटचा अर्थ हा सर्व युवा नेतृत्वाला एकत्र आणून आपण एकत्र असल्याचे दाखवून देऊ असा असू शकतो. एका राष्ट्रपतींने दुसऱ्या टर्मसाठी दावा न केल्याच्या घटना अमेरिकेत खूप कमी घडल्या आहेत. देशाचे ११ वे राष्ट्रपती जेम्स पोल्क यांनी केवळ एकच टर्म पूर्ण केली होती. त्यांनी आधीपासूनच आपण दुसऱ्या टर्मसाठी दावा करणार नसल्याचे घोषित केले होते. आणि त्यांनी तसे केलेदेखील. परंतु त्यानंतर अमेरिकेत समीकरणे बदलत गेली. त्यानंतर आता होणारे राष्ट्रपती दुसऱ्या टर्ममध्ये आपल्या पॉलिसी राबवण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या टर्मच्या तुलनेत दुसऱ्या टर्ममध्ये ते स्वतःला अधिक सुरक्षित समजत असल्याने दुसऱ्या टर्ममध्ये ते आपल्या पॉलिसी राबवतात.

दरम्यान, बायडन यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांना याच टर्ममध्ये सेवा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. बायडन स्वतःदेखील ही गोष्ट कबूल करतात. कारण 2018 मध्ये त्यांचे वय झाल्याने यावेळी त्यांच्या निवडून येण्यावर त्यांनीच शंका उपस्थित केली होती. परंतु वयोमानानुसार मी वृद्ध झालो असलो तरीदेखील बौद्धिकदृष्ट्या आणि ऊर्जेच्या मानाने मी अजूनही तरुण असल्याचे ते म्हणतात.

First published: November 21, 2020, 9:05 AM IST

ताज्या बातम्या