नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : अमेरिकेत होणाऱ्या क्वाड समिटसाठी भारताला आमंत्रण पाठवण्यात (Amrica invites India for QUAD summit) आलं असून यामुळे चीनची पोटदुखी (More trouble for China) अधिकच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परस्पर सहकार्य, व्यापार आणि सुरक्षा या त्रिसुत्रींवर चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी या समिटचं आयोजन करण्यात आलं असून अमेरिकेत ही बैठक पार पडणार आहे. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी घेणार सहभाग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून 24 सप्टेंबरला ते क्वाड समिटमध्ये हजेरी लावणार आहेत. या समिटमध्ये चार देशांमधील पायाभूत सुविधा, जलवायू प्रक्रिया उद्योग, शिक्षण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोना लसींच्या वितरणाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरला ते संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या सत्रात एका उच्चस्तरीय कार्यक्रमात भाषण करणार आहेत. चीनने घेतला क्वाडचा धसका भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा क्वाडमध्ये समावेश आहे. परस्पर सहकार्य आणि सुरक्षेच्या कारणासाठी क्वाडची स्थापना करण्यात आली आहे. सागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर भारताला जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांचं सहकार्य मिळत असल्यामुळे चीनची पोटदुखी वाढण्याची शक्यता आहे. हिंद महासागरातील सुरक्षा मजबूत करणे आणि अतिक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, हा क्वाडच्या अनेक हेतूंपैकी प्रमुख हेतू आहे. त्यामुळे भारताची ताकद वाढणार असून चीनला भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी करताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. हे वाचा - गोड बिचारं! सहा महिन्यांचं हे बाळ कधीच रडत नाही, पाहा PHOTOs चीनची कुत्सित प्रतिक्रिया पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलेली प्रतिक्रिया चीनची पोटदुखी दाखवणारीच असल्याचं सांगितलं जात आहे. इतर देशांना लक्ष्य करण्यासाठी गटबाजी करणे आणि इतरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टींना यश मिळणार नसल्याची प्रतिक्रिया जिनपिंग यांनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.