मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

लक्षवेधी : दहशतवादाशी संबंधित स्टेटमेंटमधून तालिबानचं नाव हटवलं, UNSC च्या निर्णयामुळे तालिबानला अप्रत्यक्ष मान्यता?

लक्षवेधी : दहशतवादाशी संबंधित स्टेटमेंटमधून तालिबानचं नाव हटवलं, UNSC च्या निर्णयामुळे तालिबानला अप्रत्यक्ष मान्यता?

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता जगाचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टीकोन (Perspective) बदलू लागल्याचं चित्र दिसत आहे.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता जगाचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टीकोन (Perspective) बदलू लागल्याचं चित्र दिसत आहे.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता जगाचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टीकोन (Perspective) बदलू लागल्याचं चित्र दिसत आहे.

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यानंतर आता जगाचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टीकोन (Perspective) बदलू लागल्याचं चित्र दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC) आपल्या ताज्या स्टेटमेंटमधून (Statement) तालिबानच्या नावाचा उल्लेख काढून टाकला आहे. ही बाब लक्षणीय असून जागतिक पातळीवर एक प्रकारे तालिबानला मान्यता मिळू लागल्याचे संकेत मानले जात आहेत. काय होतं स्टेटमेंट? 16 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्यांनी घेतलेल्या बैठकीत अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा सामना करणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी किंवा इतर देशांना धोका पोहोचवण्यासाठी करण्यात येऊ नये. तालिबन किंवा इतर कुठल्याही अफगाणी व्यक्तीने किंवा समूहाने इतर देशात दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करू नये, असं स्टेटमेंट काढण्यात आलं होतं. मात्र हे स्टेटमेंट आता बदलण्यात आलं असून त्यातील तालिबानचा उल्लेख वगळण्यात आला आहे. काय आहे नवं स्टेटमेंट? काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या आत्मघातकी स्फोटांनतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून आणखी एक स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरूमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आलेल्या नव्या स्टेटमेंटमध्ये पहिल्या स्टेटमेंटमधील सर्व तपशील आहे. मात्र केवळ तालिबानचा उल्लेख त्यातून वगळण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी किंवा इतर देशांना धोका पोहोचवण्यासाठी करण्यात येऊ नये. कुठल्याही अफगाणी व्यक्तीने किंवा समूहाने इतर देशात दहशतवाद पसरवण्यासाठी मदत करू नये, असं नव्या स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आलं आहे. हे वाचा -शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात 2000 जण जमले; कोरोना नियमांना बसवलं धाब्यावर आंतरराष्ट्रीय मान्यतेचे संकेत तालिबानबाबतचा युरोपीय देशांचा दृष्टीकोन बदलत असून तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायातून मान्यता मिळण्याच्या दिशेनं पावलं पडत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार तालिबाननं आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक परदेशी नागरिकांना सुरक्षित देशाबाहेर पडायला मदत केली आहे. ताज्या स्टेटमेंटनुसार अफगाणिस्तानमधील दहशतवादासाठी तालिबानला जबाबदार धरण्यात आलेलं नाही.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban, Un

    पुढील बातम्या