मुंबई, 11 जानेवारी : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षात युक्रेनच्या प्रवाशी विमानातील 176 जणांचा प्राण गेला. इराणकडून चूक झाल्याची कबुली लष्कराने दिली आहे. इराणने म्हटलं आहे की, त्यांच्याकडून चुकून युक्रेनचं प्रवासी विमान पाडलं गेलं. यामुळे विमानातील 176 प्रवाशांचा मृत्यू झाला. सुरुवातीला इराणने त्यांच्याकडून विमान पाडलं गेल्याचा आरोप फेटाळून लावला होता. तेव्हा इराणच्या राष्ट्रपतींनी अमेरिकेला 1988 च्या अमेरिकेने केलेल्या चुकीची आठवण करून दिली होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील 52 ठिकणं आमच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं होतं. त्यावर इराणचे राष्ट्रपती रूहानी म्हणाले होते की, जे 52 नंबरची चर्चा करत आहेत त्यांनी 290 नंबर कधीच विसरू नये.
इराणचे 355 एअरबस ए 300 कॅटेगरीतील विमान 1988 मध्ये पाडण्यात आलं होतं. 3 जुलै 1988 ला सकाळी इराणमधून दुबईला विमानाने उड्डाण केलं होतं. पार्सियन गल्फमधून जात असताना त्यावर अमेरिकन मिसाइलने अॅटॅक करण्यात आला होता. अमेरिकेच्या नौदलातील जहाजावरून क्षेपणास्त्र हल्ला जाला होता. यात 290 जणांचा मृत्यू झाला होता.
सध्या जशी संघर्षाची परिस्थिती आहे तशीच परिस्थिती 1980 ते 1988 च्या दरम्यान होती. तेव्हा अमेरिकेकडून चुकून इराणचे विमान पाडलं गेलं होतं. ज्यावेळी प्रवासी विमानाने उड्डाण केलं होतं तेव्हाच इराणचं एफ 14 हे फायटर विमानही झेपावलं होतं. अमेरिकन लष्कराला वाटलं की इराणचे फायटर जेट आपल्या जहाजावर हल्ला करेल. त्याआधी एक दिवस अमेरिकेनं इराणला इशाराही दिला होता.
इराणचे विमान पाडल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली तेव्हा विमान आंतरराष्ट्रीय नियमानुसार जात होते असं समोर आलं. पण त्यावेळी विमानाचा पायलट तेव्हाच्या तणावपूर्ण परिस्थितीला समजू शकला नाही आणि तो एअर ट्राफिक कंट्रोलवर प्रश्नांची उत्तरेही देत नव्हता. त्यावेळी अमेरिकनं जहाजावरून त्याला इशाराही देण्यात आला होता पण त्यावर काहीच उत्तर न आल्याचा दावा अमेरिकेने केला होता.
अमेरिकन नौदलाच्या जहाजाकडे एक अनोळखी विमान येत असल्यानं कॅप्टनला ते लढाऊ विमान असल्याचं वाटलं. जर या फायटर जेटवर हल्ला केला नाही तर आपल्या जहाजाला उडवतील या भीतीने अमेरिकेकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. यात ए300 जळून खाक झाला. याबद्दल अमेरिकेने दु:ख झाल्याचे सांगत पश्चातापाची भावना व्यक्त केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.