स्पेन, 23 एप्रिल: एका बेरोजगार युवकानं (Unemployed son) आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी युवकानं आपल्या आईची हत्या (Son killed mother) करून तिच्या मृतदेहाचे एक हजार तुकडे (dead body cut into thousands of corpses) केले आहेत. अमानुषतेचा कळस म्हणजे त्याने ते तुकडे स्वतः खाल्ले आहेत, तर काही तुकडे त्याच्या कुत्र्याला खाऊ घातले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मुलाला अटक केली आहे. दरम्यान पोलिसांना आरोपीच्या घरात फ्रिजमध्ये प्लॅस्टिगच्या बॅगेत गुंडाळून ठेवलेले काही शरिराचे भागदेखील आढळले आहेत.
संबंधित घटना स्पेनमधील माद्रिद येथील आहे. येथील 28 वर्षीय आरोपी युवकानं आपल्या आईची निर्घृण हत्या केली आहे. या आरोपी युवकाचं नाव एल्बर्टो सांचेज गोमेझ असून तो वेटरचं काम करतो. पण सध्या तो बेरोजगार आहे. मृत महिला मारिया गोमेझच्या एका मैत्रिणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरात छापा टाकला आहे. यावेळी आरोपीनं केलेलं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस मारिया गोमेझच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांनादेखील धक्का बसला आहे. एल्बर्टो गोमेझला याबाबत विचारणा केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की मारिया गोमेझच्या घरी गेल्यानंतर आरोपी मुलानं दार उघडलं. त्यानं सांगितलं की, मारिया गोमेझ घरात आहेत, पण त्या आता मेल्या आहेत.
हे ही वाचा-धक्कादायक! आईच्या शेजारी झोपलेल्या बहिणीला सख्ख्या भावाने झोपेतच संपवल
आरोपी मुलानं पुढं सांगितलं की, त्याने त्याच्या आईची हत्या करून तिचे अनेक तुकडे केले आहेत. तसेच तिच्या शरिराची काही भाग मी खाल्ले आहेत, तर काही भाग माझ्या कुत्र्यानं खाल्ले आहेत. दरम्यान तपास करत असताना पोलिसांना घरातील फ्रिजमध्ये असलेल्या प्लॅस्टिकच्या बॅगेत शरिराचे काही भागही आढळले आहेत. पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली असून त्याला किमान 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.