कीव 28 फेब्रुवारी : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. दरम्यान, रशियन सैन्याला रोखण्यासाठी युक्रेनने मोठा निर्णय घेतला आहे. युक्रेन लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कैदी आणि गुन्हेगारी संशयितांना सोडत आहे. जेणेकरून तेदेखील देशातील रशियन सैन्याविरूद्धच्या लढाईत सामील होऊ शकतील. युक्रेनच्या प्रोसिक्यूटर जनरलच्या कार्यालयातील वकील अँड्री सिन्युक यांनी सांगितलं की, सुटका करण्यात आलेल्या कैद्यांमध्ये सर्गेई टोरबिन हा माजी सैनिकही आहे. Russia-Ukraine War: नागरिकांनी अडवला रशियन रणगाड्यांचा ताफा, घटनेचा LIVE VIDEO टोरबिन यापूर्वी डीपीआर आणि एलपीआर संघर्षातही लढले होते. नागरी हक्क कार्यकर्त्या आणि भ्रष्टाचारविरोधी प्रचारक कॅटेरिना हँडझियुक यांच्या हत्येतील भूमिकेसाठी त्याला 2018 मध्ये 6 वर्षे आणि 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. जुलै 2018 मध्ये या महिलेच्या अंगावर तिच्या घराबाहेरील रस्त्यावर अॅसिड फेकण्यात आलं. यानंतर गंभीर भाजल्यामुळे तिचा रुग्णालयात मृत्यू झाला (Woman Died Due to Acid Attack). सिन्यूक म्हणाले की, टोरबिनने आपली सुटका झाल्यानंतर माजी कैद्यांची आपल्या पथकासाठी निवड केली. त्यांनी सांगितलं की, दिमित्री बालाबुखा या आणखी एका माजी सैनिकाला 2018 मध्ये बस स्टॉपवर एका माणसाला चाकूने भोसकल्याबद्दल 9 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यालाही सोडण्यात आलं आहे.
Russia-Ukraine War : युक्रेनमध्ये विद्यार्थिनींना मारहाण, धक्कादायक VIDEO समोर
रशियन सैन्य राजधानी कीवच्या जवळ पोहोचत असल्याने युक्रेनियन सरकारने आपल्या नागरिकांना शस्त्रे देण्यास सुरुवात आहे. रशियन सैन्याचा 5 किलोमीटर लांबीचा ताफा कीवच्या दिशेने निघाला आहे. देशावर आलेल्या संकटाला घाबरून पळून जाण्याऐवजी अनेक युक्रेन नागरिकांनी हातात बंदुका घेतल्या आहेत. ते आपला जीव धोक्यात घालून जगातील बलाढ्य सैन्यांशी दोन हात करत आहेत. रशियन सैन्यांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे अनेक व्हिडीओ यापूर्वी समोर आले आहेत