मॉस्को, 23 फेब्रुवारी : रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता शिगेला पोहचला आहे. परिणामी रशियाकडून (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला होण्याची भीती वेगाने वाढत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थक फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केल्यानंतरच हे घडले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढला आहे. दरम्यान, रशियाबाबत अमेरिका आणि कॅनडाकडून अनेक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. तिकडे जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी मंगळवारी सांगितले की त्यांच्या देशाने पश्चिम युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाविरूद्ध दंडात्मक उपाय म्हणून नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइनची (Nord Stream 2 Gas Pipeline) प्रमाणीकरण प्रक्रिया थांबवण्याची पावले उचलली आहेत. हा निर्णय म्हणजे जर्मनी सरकारचे महत्त्वाचे पाऊल असून, त्यावर रशियाकडून टीका होत आहे. मात्र, रशियाला आता चीनकडून मदत मिळत आहे. या पाइपलाइनच्या माध्यमातून रशियातून युक्रेन आणि पोलंडमार्गे बाल्टिक समुद्रातून जर्मनीला वायू पाठवण्याची योजना होती. मात्र, आता युरोपीय देश आणि अमेरिकेच्या निर्बंधानंतरही पुतीन यांना एक जीवनदान मिळू शकेल, त्यामुळे त्यांचा त्रास कमी होईल, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. वास्तविक काही दिवसांपूर्वी रशियाने चीनसोबत करार केला होता. याअंतर्गत रशिया पुढील 30 वर्षांसाठी चीनला गॅस पुरवणार आहे. पुतिन यांची मोठी घोषणा; युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र राष्ट्राची मान्यता या कराराअंतर्गत, रशियन-समर्थक तेल कॉर्पोरेशन गॅझप्रॉमने चिनी दिग्गज CNPC ला दरवर्षी 10 अब्ज घनमीटर गॅस पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हा करार पुतिन आणि रशियासाठी खूप उपयुक्त ठरेल, असे एका रशियन तज्ज्ञाचे म्हणणे आहे. चीनला 117 अब्ज अमेरिकी डॉलर किमतीचे रशियन तेल आणि वायू पाठवण्यासाठी दीर्घकालीन करार करण्यात आला. हा करार मॉस्कोला हल्ला झाल्यास रशियापासून युरोपपर्यंत नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइन ब्लॉक करण्याच्या अमेरिकेच्या धमक्यांचे संभाव्य परिणाम कमी करण्यास मदत करतो. ‘आम्ही घाबरत नाही’ युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची पुतिन यांना स्पष्टोक्ती चीन आणि रशियामधील या करारांमुळे रशिया 2050 पर्यंत चीनचा सर्वात मोठा पुरवठादार बनू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाच्या रोझनेफ्ट कंपनीच्या एकूण तेल उत्पादनापैकी 25 टक्के तेल आता चीनला जाऊ शकते. तसे, रशिया आधीच चीनला गॅस पुरवठा करत आहे. हा पुरवठा 2019 मध्ये सर्बिया पाइपलाइनद्वारे सुरू करण्यात आला होता. यासोबतच रशिया चीनला समुद्रमार्गे लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) पाठवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.