Home /News /videsh /

Russia Ukraine War: रशियाने मारियुपोलवर केमिकल वेपन्सचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा; युद्धाला आणखी गंभीर वळण?

Russia Ukraine War: रशियाने मारियुपोलवर केमिकल वेपन्सचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा; युद्धाला आणखी गंभीर वळण?

‘रशियानं मारियुपोलमध्ये हल्ला करण्यासाठी 'अननोन सबस्टन्स' (Unknown Substance) वापरला होता. त्यामुळे लोकांची श्वसनक्रिया बंद पडली होती. बहुधा रशियानं केमिकल वेपन्स वापरली होती,’ असा दावा युक्रेनियन खासदारांनी केला

कीव 12 एप्रिल : युक्रेन आणि रशियातील (Russia Ukraine War) संघर्ष शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आग्नेय युक्रेनमधील महत्त्वाचं बंदर असलेल्या मारियुपोल (Mariupol) या शहरासाठी दोन्ही देशांमध्ये भयानक संघर्ष झाला आहे. रशियन सैन्यानं मारियुपोल शहरामध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या लोखंड आणि स्टील प्लाँटलादेखील (Europe’s biggest iron and steel works) लक्ष्य केलं आहे. याशिवाय रशियानं मारियुपोल शहरातील आर्ट स्कूलच्या (Art School Bombed) इमारतीवर बॉम्बफेक केली. या इमारतीमध्ये 400 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात शाळेची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, रशियन बॉम्बहल्ल्यात मारियुपोलमधील 80 टक्क्यांपेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या आहेत. युक्रेनियन सैन्यानं माघार घेतली नाही तर मारियुपोलमध्ये भयकंर नरसंहार (Genocide) होऊ शकतो, अशी धमकीही रशियानं दिली होती. मारियुपोलवर हल्ला करण्यासाठी केमिकल वेपन्सचा (Chemical Weapons) वापर झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये खरोखर तथ्य आहे का? याची पडताळणी करण्याचा प्रयत्न ब्रिटन करत आहे, असं लंडनमधील एका वरीष्ठ डिप्लोमॅटनं सोमवारी सांगितलं. एनडीटीव्हीनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रशियाचा मित्र सर्बियाला चीनने गुप्तपणे पाठवली मिसाइल डिफेन्स सिस्टम, युरोपीयन राष्ट्र चिंतेत ‘रशियानं मारियुपोलमध्ये हल्ला करण्यासाठी 'अननोन सबस्टन्स' (Unknown Substance) वापरला होता. त्यामुळे लोकांची श्वसनक्रिया बंद पडली होती. बहुधा रशियानं केमिकल वेपन्स वापरली होती,’ असा दावा युक्रेनियन खासदार इव्हाना क्लिंपश (Ivanna Klympush) यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर जगभरातील देशांनी रशियावर टीकेची झोड उठवली होती. आता ब्रिटन या प्रकरणाचा तपास करत आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. लिझ ट्रस यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'रशियन सैन्यानं मारियुपोलच्या लोकांवर केलेल्या हल्ल्यात केमिकल एजंट्सचा (Chemical Agents) वापर केल्याचा संशय आहे. आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत मिळून या प्रकरणातील तपशीलांची पडताळणी करण्याचं काम करत आहोत.' 'रशिया-युक्रेन संघर्षामध्ये केमिकल वेपन्सचा वापर युद्धाला आणखी गंभीर वळणावर नेण्यास कारणीभूत ठरू शकतो. असं झाल्यास आम्ही पुतीन आणि त्यांच्या राजवटीला जबाबदार धरू,' असंही लिझ ट्रस यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या अझोव्ह बटालियननंही (Azov Battalion) सोमवारी टेलिग्राम संदेशात (Telegram Message) दावा केला होता की, रशियन ड्रोनने मारियुपोलमध्ये युक्रेनियन सैन्य आणि नागरिकांवर विषारी पदार्थ (Poisonous Substance) टाकला. फोर्सनं असाही दावा केला आहे की, त्या पदार्थामुळे नागरिकांना श्वसनक्रिया बंद पडणं आणि न्यूरोलॉजिकल समस्यांचा (Neurological Problems) सामना करावा लागत आहे. रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेचा यू-टर्न, भारताला 'या' गोष्टीवरुन इशारा देण्यास नकार बटालियनचे संस्थापक, आंद्रेई बिलेत्स्की (Andrei Biletsky) यांनी सांगितल्यानुसार, तीन जणांवर अज्ञात विषारी पदार्थाचा परिणाम झाला आहे. या तीन लोकांना वॉरफेअर केमिकल्समुळे विषबाधा झाल्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. परंतु, त्यांची स्थिती फार गंभीर नाही. बिलेत्स्की यांनी व्हिडिओ टेलिग्राममधून ही माहिती दिली. मात्र, अद्याप एएफपी (Agence France-Presse) या दाव्यांची पडताळणी करू शकलेली नाही. वरिष्ठ दोनेत्स्क फुटिरतावादी अधिकारी एडुआर्ड बासुरिन (Eduard Basurin) यांनीदेखील मारियुपोल बंदरावर केमिकल वेपन्सचा वापर झालेला असण्याची भीती व्यक्त केली होती. बासुरिन म्हणाले होते की, 'शहराला वेढा घालणारं रशियन सैन्य केमिकल वेपन्सचा वापर करून शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू शकतं.' रशियन न्यूज एजन्सी आरआयए नोवोस्टीनं सोमवारी बासुरिन यांच्या या वक्तव्याचा आधार घेऊन वृत्त प्रसिद्ध केलं. युद्धामध्ये घातक केमिकल वेपन्सचा वापर करण्याला वॉर क्राईम (War Crime) मानलं जातं. दरम्यान, रशियानं मात्र युक्रेनमध्ये आपण कोणत्याही प्रकारे वॉर क्राईम केलेला नाही, असा दावा केला आहे. ब्रिटन या प्रकरणाची पडताळणी करत आहे. ती चौकशी पूर्ण झाल्यानंतरच सत्य परिस्थिती उजेडात येऊ शकते.
First published:

Tags: Russia, Russia Ukraine, Ukraine news, War

पुढील बातम्या