Home /News /videsh /

रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेचा यू-टर्न, भारताला 'या' गोष्टीवरुन इशारा देण्यास नकार

रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेचा यू-टर्न, भारताला 'या' गोष्टीवरुन इशारा देण्यास नकार

US India Russian Oil: अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) दलीप सिंग यांनी भारत दौऱ्यावर असताना रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा इशारा दिला होता. या वक्तव्यावर आता व्हाईट हाऊसने यु टर्न घेतला आहे.

    वॉशिंग्टन, 9 एप्रिल : व्हाईट हाऊसने रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांचा इतर देशांसाठी विचार केला जाऊ शकतो, असे वृत्त फेटाळून लावले आहे. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की रशियन तेल आयात करायचे की नाही हा प्रत्येक देशाचा स्वतःचा निर्णय आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) दलीप सिंह यांनी भारत दौऱ्यावर असताना रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा इशारा दिला होता. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केले की भारत रशियाकडून त्याच्या एकूण ऊर्जा आयातीपैकी फक्त एक ते दोन टक्के आयात करतो. साकी म्हणाले, “हा भारतासह प्रत्येक देशाचा निर्णय आहे की त्यांनी रशियन तेल आयात करायचे की नाही. जे त्यांच्या एकूण आयातीच्या केवळ 1 ते 2 टक्के आहे. त्यांच्या आयातीपैकी सुमारे 10 टक्के कच्च तेल युनायटेड स्टेट्समधून येते." दलीप सिंग यांच्या इशाऱ्यावर व्हाईट हाऊसने काय म्हटले? भारताला रशियन तेलाची खरेदी न वाढवण्यासाठी दुलीप सिंग यांनी अमेरिकेकडून इशारा दिला होता. असे झाल्यास कदाचित अशाच प्रकारचे निर्बंध इतर देशांसाठी विचारात घेतले जात आहेत, ज्या अंतर्गत त्यांना रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी पूर्वीच्या तुलनेत मर्यादित असेल. मात्र, आता जेन साकी यांनी उत्तर दिलंय, की "मी याला इशारा म्हणणार नाही किंवा आम्ही त्यावेळी तसं बोललो नाही." रशिया-युक्रेन युद्धानंतर धान्याच्या किमती रेकॉर्ड ब्रेक पातळीवर! वाचा कोणत्या वस्तूंवर पडणार प्रभाव 'भारत-अमेरिका भागीदारी महत्त्वाच्या संबंधांपैकी एक' साकी म्हणाले, की "त्यांनी जाऊन विधायक चर्चा केली आणि स्पष्ट केले की रशियन तेल आयात करायचे की नाही हा भारतासह प्रत्येक देशाचा निर्णय आहे," पुढे ते म्हणाले, "अध्यक्ष (ज्यो) बायडेन यांचा विश्वास आहे की भारतासोबतची आमची भागीदारी जगातील आमच्या सर्वात महत्त्वाच्या संबंधांपैकी एक आहे." साकी म्हणाले, की त्यांनी निर्बंधांचे पालन केले पाहिजे, जे त्या (तेल खरेदीवर) निर्णयाशी संबंधित नाही. मात्र, त्याच वेळी, आम्ही त्यात विविधता आणण्यासाठी आणि 1 ते 2 टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी मदत करणार आहोत” तेल खरेदीला मंजुरी लागू होत नसल्याच्या स्पष्टीकरणाचा त्यांनी पुनरुच्चार केला. सिंग हे यूएस नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमध्ये आर्थिक घडामोडींचे प्रभारी आहेत, रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांबाबत बायडेन-नियुक्त प्रमुख व्यक्ती आहेत. रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या आपल्या युरोपीय मित्र देशांना सामावून घेण्यासाठी अमेरिकेने ऊर्जा खरेदीवर निर्बंध लादण्याचे टाळले आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine

    पुढील बातम्या